NMC-e-connect-app
NMC-e-connect-app 
उत्तर महाराष्ट्र

एनएमसी ई-कनेक्‍ट ॲपद्वारे ९४ टक्के तक्रारींचा निपटारा

सकाळवृत्तसेवा

नाशिक - नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी यापूर्वी तयार करण्यात आलेल्या ‘स्मार्ट नाशिक ॲप्लिकेशन’पेक्षाही नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘एनएमसी ई-कनेक्‍ट’ला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ६७ दिवसांत तब्बल पाच हजार ५२६ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यातील पाच हजार १९४ तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात आले. तक्रारी सोडविण्याचे प्रमाण जवळपास ९३.९९ टक्के इतके आहे.

२०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्मार्ट नाशिक ॲप्लिकेशनची निर्मिती केली होती. त्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या तक्रारी करणे शक्‍य झाले. त्याव्यतिरिक्त पारदर्शी कामकाज करण्याचा भाग म्हणून सध्या सुरू असलेल्या कामांची प्रगतीही त्या माध्यमातून लक्षात येत होती. स्मार्ट नाशिक ॲप्लिकेशन तब्बल ५८ हजार नाशिककरांनी डाउनलोड केले होते. त्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ॲप्लिकेशनमध्ये बदल करत एनएमसी ई-कनेक्‍ट सुधारित ॲप्लिकेशन आणले. त्यावर ६७ दिवसांमध्ये पाच हजार ५२६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांपैकी पाच हजार १९४ तक्रारींचे निराकरण करण्यात आले.

तांत्रिक कारणांमुळे ३३३ तक्रारी प्रलंबित असून, ८१ तक्रारींवर तक्रारदारांचे समाधान झाले नाही. आयुक्त मुंढे यांनी चोवीस तासांत तक्रारीची दखल घेण्याबरोबरच सात दिवसांत तक्रारींचे निवारण करणे बंधनकारक केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. प्राप्त तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी विद्युत विभागाशी संबंधित असून, त्याची संख्या एक हजार १८१ आहे. त्यातील ३३ तक्रारी प्रलंबित आहेत. त्यानंतर अतिक्रमण विभागाशी संबंधित ७७९ तक्रारींपैकी ८६ तक्रारी प्रलंबित राहिल्या आहेत. 

घनकचरा व्यवस्थापन व घंटागाडी संदर्भातील ६२ तक्रारींपैकी ४६ तक्रारी प्रलंबित आहेत. पाणीपुरवठ्याशी संबंधित ७०३ तक्रारींपैकी २५ तक्रारी प्रलंबित आहेत. बांधकाम विभागाच्या ५५९ पैकी २३, मलेरिया विभाग व भटक्‍या कुत्र्यांसंदर्भातील ३९१ पैकी २६, उद्यान विभागाच्या ३९१ पैकी १७, मलनिस्सारण विभागाच्या ३१५ पैकी वीस, पावसाळी गटार योजना विभागाच्या १५१ पैकी बारा, नगररचना विभागाशी संबंधित ९४ पैकी पंधरा तक्रारी प्रलंबित आहेत.

काम सुधारण्यासाठी ताकीद
आयुक्त मुंढे यांनी खातेप्रमुखांची सोमवारी (ता. ७) बैठक घेत ८ मेस नव्वद दिवस पूर्ण होत असल्याची आठवण करून देत कामकाजात सुधारणा करण्याची अंतिम मुदत संपत असल्याचे सांगितले. आता यापुढे कामचुकारपणा आढळून आल्यास कोणाची गय केली जाणार नसून कारवाई अटळ असल्याचे सांगितले. आयुक्तांनी साडेपाच तास बैठक घेतली. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच बैठकीत त्यांनी कार्यपद्धती समजावून सांगितली होती. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्याबरोबरच कामचुकार व भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुनावताना सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT