No petrol diesel left in Taloda  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : तळोद्यात पेट्रोल-डिझेल शिल्लक नसल्याचे फलक; पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा

केंद्र सरकारने ‘हिट ॲन्ड रन’ केसप्रकरणी दहा वर्षे शिक्षा आणि साडेसात लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात केली आहे. या कायद्याविरोधात विविध संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : केंद्र सरकारने ‘हिट ॲन्ड रन’ केसप्रकरणी दहा वर्षे शिक्षा आणि साडेसात लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात केली आहे. या कायद्याविरोधात विविध संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. तळोद्यातील दोन पेट्रोलपंपांवर मंगळवारी (ता. २) सकाळपासूनच पेट्रोल-डिझेल शिल्लक नसल्याचे फलक, तर भाजीपाल्याचे दरदेखील वाढलेले दिसून आले.

त्यामुळे शहरातील नागरिकांना आंदोलनाचा चांगलाच फटका बसत असल्याचे चित्र आहे. (No petrol diesel left in Taloda Nandurbar News)

नव्या मोटार वाहन कायद्यात अपघात झाल्याच्या स्थितीत ट्रकचालकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. या प्रकरणी त्याला दहा वर्षांची शिक्षा व साडेसात लाखांच्या आर्थिक दंडाला सामोरे जावे लागेल. या तरतुदीला देशभरातील ट्रक व टँकरचालकांनी विरोध केला आहे.

केंद्राच्या या कथित वादग्रस्त कायद्याला बीपीसीएल, एचपीसीएल व इंडियन ऑइल या तिन्ही सरकारी तेल कंपन्यांच्या टँकरचालकांनी विरोध केला असून, या प्रकरणी देशभरात विविध ठिकाणी सोमवारी व मंगळवारी आंदोलन करण्यात आले.

हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी पेट्रोलियम कंपन्यांच्या टँकरचालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामुळे इंधनाचा पुरवठा पूर्णतः विस्कळित झाला आहे. याचा फटका तळोदा शहरातील व तालुक्यातील नागरिकांनादेखील बसत आहे.

ट्रकचालकांच्या आंदोलनामुळे पेट्रोलपंपावर पेट्रोल, डिझेल पुरवठा करणाऱ्या गाड्या येतील की नाही या भीतीने शहरातील नागरिकांनी सोमवारी रात्रीच आपापल्या दुचाकी व चारचाकी घेऊन पेट्रोलपंपावर गाड्यांच्या टाक्या भरून घेण्यावर जोर दिला. रात्री आंदोलनाची चर्चा एकमेकांना ऐकवून ‘पेट्रोल भरून घ्या’ असा सल्ला एकमेकांना देताना नागरिक सर्वत्र दिसून आले.

त्यामुळे शहरातील दोन पेट्रोलपंपांवरील इंधन मंगळवारी सकाळपर्यंत संपून गेले होते. त्यामुळे त्या ठिकाणी सकाळीच पेट्रोल-डिझेल शिल्लक नसल्याचे फलक लावलेले दिसून आले. मात्र शहराबाहेरील पेट्रोलपंपावर इंधन उपलब्ध असल्याने सकाळपासूनच त्या ठिकाणी नागरिकांनी इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

त्यामुळे तेथे नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. त्याचप्रमाणे भाजीपाल्याचे दरदेखील वाढलेले दिसून आले. त्यामुळे शहरातील नागरिकांना आंदोलनाचा चांगलाच फटका बसत असल्याचे चित्र आहे.

अनेकांनी साधली संधी

आंदोलनाचा फटका सर्वांना बसत असताना त्यातही काही संधिसाधू दिसून आले. शहरातील एका पेट्रोलपंपावर वाहनधारकांची पेट्रोल भरण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. त्यात गरजवंत पेट्रोल भरताना दिसून आले, तर काही जण पेट्रोलचा साठा करताना दिसून आले. साठा केलेले पेट्रोल संधिसाधूंनी जादा दराने विक्री केली नाही तर नवलच!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babar Azam च्या कारकीर्दिला पूर्णविराम? पाकिस्तानने संघातून केली हकालपट्टी; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर झाला 'गेम'

Stock Market Today: शेअर बाजारात 22 लाख कोटींचे नुकसान! सलग तिसऱ्या दिवशी बाजार लाल रंगात बंद; कोणत्या सेक्टरला फटका?

Crime: 'तुमच्या आधार कार्डचा वापर करून मनी लाँड्रिंग झालेय’, सरकारी अधिकाऱ्याची फसवणूक; ४९ लाख रुपयांचा गंडा

Latest Marathi News Live Update : आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मदत जाहीर करा- अन्यथा परीणाम भोगावे लागतील- राजू शेट्टी

T20 WC, IND vs ENG: वानखेडेची खेळपट्टी पाहून गौतम गंभीर क्युरेटरवर संतापला? सेमीफायनलपूर्वी ड्रामा, त्या व्हायरल फोटोमुळे चर्चा

SCROLL FOR NEXT