esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : उपजिल्हा रुग्णालयातील अवैद्यकीय सेवा बंद, रुग्ण सलाइनवर

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचासह साक्री व शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील अवैद्यकीय सेवा बंद असल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. इतर जिल्ह्यांत सुरू असलेल्या अवैद्यकीय सेवा धुळे जिल्ह्यातही सुरू ठेवण्यात याव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत. (Non medical services in Upazila Hospital closed dhule news)

शासनाच्या निर्णयाप्रमाणे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात २००५ पासून अवैद्यकीय सेवा सुरू आहेत. नाशिक विभागातील नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांत अवैद्यकीय सेवा सुरू असून, फक्त धुळे जिल्ह्यातच का बंद आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

याला फक्त लालफितीचा बेजबाबदारपणा व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सुविधा बंद आहेत. राज्य शासनाने २००५ पासून शासकीय रुग्णालयातील ५० व १०० खाटांच्या रुग्णालयात सुरक्षा सेवा, स्वच्छता सेवा, वाहनचालक सेवा, वस्त्र धुलाई, आहार सुविधा, इलेक्ट्रिशियन सेवा, कुशल व अकुशल आदी सेवा २४ तास करार पद्धतीने घेण्यात येतात.

जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे अवैद्यकीय सेवा बंद करून ठेवल्या आहेत. शिरपूर, दोंडाईचा व साक्री उपजिल्हा रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्यावर रुग्णालयात अंधार होतो.

खासगी वायरमन वेळेवर येत नसल्याने वीजपुरवठा विस्कळित होत असल्याने रुग्णांचे नातेवाईक, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यात वादविवाद होतात. जिल्ह्यात अवैद्यकीय सेवा खंडित करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान! २३ हजार ३९३ सभासदांचा कौल; ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज निकाल

AI Farming: ‘एआय’तंत्राच्या मदतीने थोपविला दुष्काळ!तटबोरगावच्या शेतकऱ्याने वाचवला १५ एकर ऊस, पाण्याचीही बचत

SCROLL FOR NEXT