leopard-inspection
leopard-inspection 
उत्तर महाराष्ट्र

कजगाव परिसरात बिबट्याचा वावर ही अफवाच

प्रमोद पवार

कजगाव (ता. भडगाव) - येथील परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा होत असताना आज (गुरुवार) पुन्हा गावालगत एका शेतात झाडावरून बिबट्याने उडी मारल्याने शेत मजूर यांनी बघितले असल्याची चर्चा होती माञ ती पण अफवाच ठरली असे वन विभागाचे अधिकाऱयांनी सांगितले 

आज दुपारी १२ सुमारास येथील महेद्रसिंग पाटील यांच्या शेतात मजूर काम करत असताना एका माणसाला झाडावरून बिबट्यासदृश प्राण्याने झाडावरून उडी मारली असल्याचे दिसताच त्याने घाबरत गावाकडे धाव घेतली या बाबत बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच शेतात असलेले शेतकरी व मजूर घराकडे निघून आले यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. याबाबत नक्की काय प्रकार आहे,  यासाठी लोकनियुक्त सरपंच यांचे पती दिनेश पाटील यांनी वनविभागाशी संपर्क साधला. चाळीसगाव विभागाचे वनक्षेञपाल संजय मोरे यांनी आपल्या कर्मचाऱयांसोबत दाखल झाले. ज्या माणसाने बिबट्या असल्याची सांगितले, त्यांना नेमके काय झाल आणि कोठे आढळला,यासंदर्भात विचारणा केली. परंतु ज्या झाडावरून बिबट्याने उडी मारली तेथे चढ्याचा माग दिसून आला नाही. माञ नागरिकांना केळीच्या बागेत एका प्राण्याचे ठसे दिसून आले होते. तेथे देखील पाहणी दरम्यान हे ठसे बिबट्या किंवा वाघ नसल्याचे मोरे यांनी सांगितले.

यावेळी लोकनियुक्त सरपंच दिनेश पाटील ,हीरालाल पवार,माजी सभापती एकनाथ महाजन,बाळासाहेब पाटील,लालसिंग राजपूत,आण्णा बोरसे ,मयुर पाटील,गोपाल पुजारी,राहुल पाटील,तात्या सोनार,व शेतकरी हजर होते.

*नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये: मोरे 

गेल्या दोन दिवसापासून कजगाव परिसरात बिबट्या दिसल्याची अफवा होत आहे तरी देखील खबरदारी म्हणून प्रत्यक्ष परिसरात ची पाहणी केली असता काही एक तसा प्रकार दिसून येत नाही. तसेच एखादी हल्ला झाल्याची घटना देखील झाली नाही तरी नागरिकांनी अफवा वर विश्वास ठेवू नये अन्यथा लांडगा आला रे आला अशी फसगत होता कामा नये. वन विभागाला सहकार्य करावे, आमचे काम चालू आहे, असे मोरे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT