Nutrition Food 
उत्तर महाराष्ट्र

‘पोषण आहारा’साठी अंतिम मुदत

नीलेश पाटील

शनिमांडळ (जि. नंदुरबार) - शाळांनी बॅंक खात्याचा तपशील व्यवस्थित न दिल्याने तसेच राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते नसणे, आयएफएससी कोड व्यवस्थित न भरणे आदी कारणांमुळे राज्यातील एक हजार ५१ शाळांना जुलैपासून पोषण आहाराचे अनुदान वितरित करता आलेले नाही. यासाठी सरकारने आता या शाळांना पूर्ततेसाठी रविवारपर्यंत (ता.२०) अंतिम मुदत दिली आहे. 

मुदतीत माहिती न दिल्यास संबंधित शाळांना अनुदान मिळणार नाही. याची जबाबदारी शाळेची व संबंधित अधिकाऱ्यांची राहील, असे शालेय पोषण आहार योजनेचे राज्य समन्वयक दिनकर टेमकर यांनी स्पष्ट केले आहे. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत इंधन, भाजीपाला अनुदान व शहरी भागातील शाळांचे धान्यादी मालाचे अनुदान एप्रिल २०१८ पासून थेट शाळांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे; परंतु राज्यातील एक हजार ५१ शाळांच्या बॅंक खात्यांची माहिती चुकीची असल्यामुळे अनुदान देता आलेले नाही. 

पोषण आहार योजनेचे अनुदान शाळांच्या खात्यावर आरटीजीएस पद्धतीने जमा करण्यासाठी ‘एमडीएस’ पोर्टल होते. तालुका लॉगिनवरून शाळांच्या बॅंक खात्यांची माहिती अद्ययावत करण्यात आली होती. ज्या शाळेच्या बॅंक खात्याची माहिती चुकीची आहे अशांना अद्ययावत करण्याबाबत वारंवार निर्देश देण्यात आले आहे, तरीही अद्याप अनेक शाळांनी दुरुस्ती केलेली नाही. बॅंक खात्याची माहिती अद्ययावत करून संचालनालयास रविवारपर्यंत सादर करावी, त्यानंतरच इंधन, भाजीपाला व धान्याचे अनुदान शाळांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फरसावाले बाबा कोण? मृत्यूमुळे शिष्य आणि भाविक आक्रमक, महामार्ग रोखला

World Record: १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय T20त शतक! नाबाद १११ धावांनी रचला इतिहास; अनेक विक्रम मोडले, फलंदाजने मैदान गाजवले

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

April Travel Destination: एप्रिलमध्ये ट्रिप प्लॅन करताय? या’ 5 ठिकाणांना भेट देणं ठरेल बेस्ट

बॅट दे रे...! T20 World Cup मध्ये तीन भोपळ्यांनंतर अभिषेक शर्माचा मेसेज येताच काय दिलं शुभमन गिलने उत्तर; पाहा Video

SCROLL FOR NEXT