old age parents 
उत्तर महाराष्ट्र

वृध्दापकाळात आई-वडिलांना सांभाळा, अन्यथा होणार कारवाई; या समाजाने घेतला निर्णय

एल. बी. चौधरी

सोनगीर : जिल्ह्यातच नव्हे देशभरात आई वडीलांना वृध्दापकाळात वाऱ्यावर किंवा वृृद्धाश्रमात सोडणारी युवा पिढी पहाता सामाजिक अस्वस्थता वाढत आहे. सर्वच जाती - धर्मात अशा घटना घडून येेत असून त्यावर कोणतीही प्रभावी कायदा नसल्याने अनेेक वृध्दांच्या नशिबीत हालअपेष्टाचे जीवन आले आहेे.

गावोगावी वृध्द मातापित्यांचे हाल होत असताना सामाजिक जनजागृती व सामाजिक कारवाई प्रभावी ठरू शकते. म्हणून येथील तिळवण तेली समाजाने माता पित्यांना न वागणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार नव्हे तर असहकार करण्याचे ठरवले आहे. त्यांना सर्व कार्यक्रमात बोलवायचे पण त्यांच्याकडील फक्त लग्न व मयताच्या कार्यक्रमात जायचे नाही. मात्र इतरवेळी नेहमीप्रमाणेच संबंध कायम असतील असे ठरले. त्यामुळे किमान लोकलाजेस्तव तरी वृध्द आई वडीलांना सांभाळावे लागेल. त्यामुळे अंतिम समयी तरी त्यांची हेडसांड होवू नये असा उदात्त हेतू त्यामागे आहे.

तेली समाजाची बैठक
यापार्श्‍वभूमीवर येथील तिळवण तेली समाजाच्या वार्षिक बैठकीत आई वडिलांना वागणे बंधनकारक केले असून न वागणाऱ्या मुलांवर कारवाई करण्याचेे ठरले. दरम्यान लवकरच समाजाचे भव्य मंगल कार्यालय बांधण्याचा निर्णय झाला. त्यासाठी ऐसपैस जागा विकत घेतली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तेली समाजाचे अध्यक्ष नंदकुमार चौधरी होते.

गरजूंना मदत
बैठकीत वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जमाखर्च सादर करण्यात येऊन पुढील वर्षाचे नियोजन करण्यात आले. समाजाच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत निर्णय झाला. गरजूंना आर्थिक मदत देण्यात आली. समाजातर्फे संत जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो. त्याचे नियोजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

तेली पंचमंडळाचे सचिव ज्ञानेश्वर चौधरी, सदस्य मधुकर चौधरी, अशोक चौधरी, प्रवीण चौधरी, गोपीचंद चौधरी, प्रल्हाद चौधरी, तुकाराम चौधरी, किशोर चौधरी, प्रदीप चौधरी, सुरेश चौधरी, छगन चौधरी, एल.बी.चौधरी, सुनील चौधरी, रमेश चौधरी, जीवन चौधरी, पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी, राजेंद्र चौधरी, गोपाल चौधरी, संंजय चौधरी, रामकृष्ण चौधरी, देवबा चौधरी, सुकलाल चौधरी, राजेश चौधरी, रवींद्र चौधरी, भैैय्या चौधरी, भावेश चौधरी आदी समाज बांधव उपस्थित होते.
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT