crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : कुऱ्हाडीचा घाव घालत धनपूर येथे एकाचा खून

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : कुरापत काढत एकाने कुऱ्हाडीच्या घाव घालत खून केल्याची घटना मोठा धनपूर (ता. तळोदा) येथे नुकतीच घडली. त्याबाबत तळोदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.(one kill in normal thing by axe nandurbar crime news )

धरमसिंग नुऱ्या पाडवी (वय ३५, रा. छोटा धनपूर, ता. तळोदा) यास ३० नोव्हेंबरला त्याच्या राहत्या घराच्या अंगणात सार्वजनिक ठिकाणी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कालूसिंग नुऱ्या पाडवी (४९, रा. मोठा धनपूर) याने कुरापत काढत मानेवर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

मृत व आरोपी कालूसिंग पाडवी तळोदा कोर्टात गेले. मात्र कोर्टाला सुटी असल्याने पुढील महिन्याची सात तारीख मिळाली. त्यानंतर ते दोघे धनपूर येथे येण्यासाठी तळोदा शहरातील चिनोदा चौफुली येथे आले.

या वेळी आरोपीने मृताबरोबर येत नाही ‘तू मला भाडे दे’ असे सांगितले. मात्र त्याने पैसे दिले नाहीत म्हणून संशयित आरोपीने मृताला शिवीगाळ केली. तेव्हा मृताने ‘तू शिवीगाळ का करतो’ अशी विचारणा केली व कानशिलात मारले.

त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. त्याचा राग मनात धरून हा खून केल्याची फिर्याद मृताचे काका मधुकर ऋता पाडवी यांनी दिली. तळोदा पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्हा दाखल झाला असून, पोलिस महेश निकम तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT