उत्तर महाराष्ट्र

15 हजारांच्या वादातून एकाची हत्या

सकाळवृत्तसेवा

वणी (नाशिक) :  उसणवारीने घेतलेल्या पैशाचा तगादा लावून जीवे मारण्याची धमकी देत असल्याच्या कारणावरुन तरुणाचा खून केल्याची कबुली दोघा संशयितांनी दिली आहे. असून कृृृृष्णगांव शिवारातील अज्ञात तरुणाचा झालेल्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

वणी- नासिक रस्त्यावर कृष्णगांव शिवारात सोमवारी अज्ञात तरुणाचा अज्ञातांनी खून केला होता. त्याचा मृतदेह मिळून आला होता. याबाबत वणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन पाटील व सहकारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. दरम्यान, घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे जावून पोलिस अधिक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांनी त्यांचे पथकासह घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. तसेच मयताचे अंगावर मिळून आलेल्या वस्तू व निशाण्यांवरून मयत युवक हा नाशिक येथील अक्षय उर्फ आषुतोश रामा चव्हाण (वय 21, रा. कोणार्कनगर, पंचकृष्न लाॅन्स जवळ, नाशिक) असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सदर गुन्ह्याचे समांतर तपासात असताना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी दोन इसम मयतासोबत नाशिक शहरातील जत्रा हाॅटेल परिसरातून एका सफेद रंगाचे कारमध्ये बसून गेले असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी जत्रा हाॅटेल ते धात्रक फाटा परिसरात अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेत रामदास उर्फ पिन्या दौलत पवार (वय 26, रा. निशांत गार्डन, धात्रकफाटा, नाशिक मुळ रा. भऊर, ता.देवळा) व किशोर बाळासाहेब पवार (वय 26, रा. भऊर, ता.देवळा, जि.नाशिक) या संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी अक्षय यास जिवे ठार मारल्याची कबुली दिली.

सदर संशयितांना 03 फेब्रुवारी रोजी मयत अक्षय यास जत्रा हाॅटेल परिसरातून त्यांचेकडील ह्युंदाई कारमध्ये बसवून त्याच्यासोबत 10 वा मैल परिसरात एका हाॅटेलेमध्ये जेवण केले व तेथून त्यास वणी ते दिंडोरी रोडवर कृष्णगांव शिवारात घेवून जावून लघुशंकेसाठी कार थांबविली. तेव्हा त्यांचेत शिवीगाळ व बाचाबाची झाली, त्यात आरोपी रामदास उर्फ पिन्या पवार व किशोर पवार यांनी दोघांनी मयत अक्षय यास जमीनीवर खाली पाडुन त्याचे डोक्यात दगड टाकून, चेहरा विद्रुप करून जिवे ठार मारले असल्याची कबुली दिली आहे.

सदर खुनाचे गुन्हयातील आरोपी रामदास उर्फ पिन्या दौलत पवार याने गेल्या वर्षी मयत अक्षयकडून 15 हजार रूपये व्याजाने उसनवार घेतलेले होते. गेल्या काही दिवसांपासून अक्षय हा आरोपींकडे पैशांसाठी तगादा लावत होता. तसेच उसनवार दिलेल्या पैशांवर व्याज घेवून वारंवार जास्त पैशांची मागणी करत असे व पैसे न दिल्यास आरोपी रामदास यास व त्याचे कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे या त्रासाला कंटाळून दोघांनी अक्षय चव्हाण यास ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सदर आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली हयुंदाई 
एॅक्सेंट कार क्र. एम.एच.15.ई.ई.0903 ही जप्त करण्यात आली असून वरील दोन्ही आरोपींना पणी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

पोलिस निरीक्षक अशोक करपे, सहायक पोलिस निरीक्षक राम कर्पे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील, पोहवा दिपक आहिरे, दत्तात्रय साबळे, पुंडलीक राउत, नामदेव खैरणार, कैलास देशमुख, विष्णु जुंदरे,  प्रविण सानप,  काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, संदिप लगड यांचे पथकासह वणी पोलिसांनी घटनेचा तपास केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT