amol bardole esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : तापी नदीत ट्रक कोसळला; एक बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : सहचालकाशी भांडण करून चालक रागाच्या भरात ट्रक घेऊन निघाला आणि काही मीटर अंतरावरच पुलाचा कठडा तोडून तापी नदीत कोसळला. ही घटना रविवारी (ता. २६) साडेचारला सावळदे (ता. शिरपूर) येथे घडली.

पाऊस आणि अंधारलेले वातावरण यामुळे ट्रकचा शोध घेता आला नाही. दरम्यान, पोलिसांनी सहचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.(One missing after truck crashes in Tapi river dhule news)

मध्य प्रदेशाकडून कर्नाटकात धान्य घेऊन जाणारा ट्रक (एमपी ०९, एचएच ६१६७) सावळदे गावाजवळ थांबला होता. दुपारी चालक अमोल मदन बारडोले (रा. खरगोन, मध्य प्रदेश) याचा सहचालक कालू रुमालसिंह बारडोले (रा. खरगोन) याच्यासोबत वाद झाला. त्यामुळे संतापाच्या भरात चालक अमोल बारडोले ट्रक घेऊन निघाला.

मात्र त्याचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक सावळदे गावापुढे पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळला. हा प्रकार लक्षात येताच पुलावर ग्रामस्थांची गर्दी जमली. नरडाणा व शहर पोलिसही घटनास्थळी पोचले. डीवायएसपी सचिन हिरे, पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे व सहकाऱ्यांनी गर्दी पांगवून शोध सुरू केला. मात्र पाऊस व अंधार यामुळे शोधकार्य थांबविणे भाग पडले.

चुलतभावांत वाद

दरम्यान, या घटनेनंतर सहचालक कालू बारडोले याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने आम्ही चहा घेण्यासाठी उतरलो. मी तेथील दुकानातून नाइट पॅन्ट खरेदी करण्यासाठी गेलो असता चालक अमोल बारडोले ट्रक घेऊन निघून गेल्याची माहिती दिली. मात्र सहचालकाला सोडून चालक का निघून गेला याबाबत त्याने माहिती दिली नाही.

विशेष म्हणजे दोघेही एकमेकांचे चुलतभाऊ आहेत. त्यामुळे दोघांमध्ये भांडण झाल्याने अमोल ट्रक घेऊन निघाला व ट्रकसह नदीत बुडाला, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. सोमवारी (ता. २७) पुन्हा शोधकार्य सुरू करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT