wani
wani 
उत्तर महाराष्ट्र

इस्त्री दुकानदाराचा प्रामाणिकपणा, 3 लाखांचे दागिने केले परत

दिगंबर पाटोळे

वणी (नाशिक) : इस्त्री करण्यासाठी आलेल्या कपड्यांमध्ये सापडलेले सुमारे तीन लाख किमंतीचे दागिने लाँड्री चालकाने लालच व मोह न बाळगता, सर्व दागिने मूळ मालकास प्रामाणिकपणे सुपूर्त केलेे असूूून त्यांच्या प्रामाणिकपणाची सर्वत्र चर्चा होत असून त्यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे.

येथील सामाजिक कार्यकर्ते व १०८ रुग्णवाहिकेचे चालक राजेंंद्र परदेशी व नाशिक आगाराचे चालक पप्पु परदेशी यांच्या घरात विवाह सोहळा असल्याने त्यांच्याकडे नितीनसिंह बलरामनवर रा. सोलापुर हे पाहुणेे आलेले होते. विवाहात परीधान करण्याच्या हेतूने आणलेले दागिने त्यांंनी सुरक्षितेच्या दृष्टीने कपड्यांमध्ये घालून ठेवलेे होते व तेच कपडे पाहुण्या मुलाकडे त्यांनी अनावधानाने इस्तरी करण्यासाठी दिले. सदरचे कपडे येथील शनिमंदीर चौकातील स्वरुप लाँड्रीचे संचालक प्रकाश आहेर यांच्याकडे सोमवारी (ता.६) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास देवून कपडे विवाहासाठी लागत असल्याने अर्जंट देण्याची मागणी करुन निघून गेला.

दरम्यान इस्त्री करण्यासाठी  प्रकाश आहेर यांनी सदरचे हातात घेवून पाणी मारत असतांना त्यांना सोन्याचे दागिने असलेले पाकीट मिळून आले. त्यात अंगठी ६, चैन २, कानातले १, नेकलेस १ असे सुमारे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आढळले. यावेळी श्री. आहेर यांनी क्षणाचाही विचार व लालूच मनात उत्पन्न होवू न देता याबाबतची माहिती त्यांनी बाबा जहागीरदार, जमिर शेख, सुरेश वर्मा, गणेश पिंगळे, अजित थोरात यांना बोलावत घडलेल्या प्रकाराची माहिती देत सदरचे दागिणे मुळ मालकांस परत देण्याची इच्छा व्यक्त केली. व्यवसायाने सोनार असलेल्या सुरेश वर्मा यांनी सदरचे दागिणे तपासले असता ते खरे असल्याचे सांगितले. कपडे देण्यासाठी पाहुण्या मुलाचाही परीचय नसल्याने परीसरात कोणाकडे विवाह आहे याचा तपास केला असता. पप्पू परदेशी यांच्याकडे विवाह असल्याने पाहूण्यांची गर्दी असल्याचे समजले. त्यावरून तेथील कपडे असावेत असा कयास बांधत त्यांस फोन केला. त्यांनी देखिल लगेच घरी फोन करत कुणी पाहुण्यांनी कपडे इस्तरीला टाकले का? अशी चौकशी केली असता सदर बाब लक्षात आली.

सदरचे कपडे हे पप्पु परदेशी यांच्या कडे आलेल्या पाहुण्यांचे आहेत हे निश्चित झाल्यावर त्यांस व पाहुण्यास बाेलावत त्यांच्या बाब निदर्शनास आणुन दिली व सदरचे सोने उपस्थित सर्वांसमक्ष मुळ मालकांस ओळख पटवुन देत परत करण्यात आले. आपले सोने परत मिळाले असता नितिनसिंह यांनी लाँड्री चालकाचे आभार मानत सत्कार केला व त्यास त्याच्या प्रामाणिक पणाबद्दल योग्य मोबदला देत आभार मानले. या प्रकाराबाबत संपुर्ण वणी परिसरातुन लाँड्री मालक यांचे कौतुक होत आहे. यावेळी शनैश्वर मित्र मंडळ वणी यांचे तर्फे प्रकाश आहेर सत्कार करण्यात आला. 

यापूर्वीही प्रकाश आहेर यांच्या लाँड्रीत इस्तरीसाठी आलेल्या कपड्यांमध्ये चुकुन ग्राहकांचे सोने व पैसे आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यावेळीही त्यांनी प्रामाणिकपणे ते परत केलेले असल्याने त्यांच्या प्रामाणिकपणे कौतूक केले तेवढे कमीच आहे...
- जमिर शेख, युवा सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT