Pankaj Mahale sakal
उत्तर महाराष्ट्र

Marriage : ‘बागायतदार आहे, बागायतदारीन पाहिजे!’; मुंडावळ्या बांधून बागायतदाराचे अनोखे आंदोलन

अलीकडच्या काळात नोकरी नसेल तर छोकरी मिळत नाही, असे चित्र आहे. सधन शेतकरी असला तरी त्यास कोणी मुलगी द्यायला तयार होत नाही.

सकाळ वृत्तसेवा

अलीकडच्या काळात नोकरी नसेल तर छोकरी मिळत नाही, असे चित्र आहे. सधन शेतकरी असला तरी त्यास कोणी मुलगी द्यायला तयार होत नाही.

पाचोरा (जि.जळगाव) - अलीकडच्या काळात नोकरी नसेल तर छोकरी मिळत नाही, असे चित्र आहे. सधन शेतकरी असला तरी त्यास कोणी मुलगी द्यायला तयार होत नाही. त्यामुळे अनेक सधन शेतकऱ्यांची मुले, शेती काम करणारे तरुण लग्नाविना असल्याचे व त्यातून कौटुंबिक मनस्ताप व कलह वाढीस लागत असल्याचे आपण पाहतो, अथवा ऐकतो.

विवाहासाठी मुलाची निवड करताना त्यास नोकरी असावी, तो एकटाच असावा, आई, वडील व कुटुंबीयांपासून दूर नोकरीस असावा यासोबतच त्यास शेती असावी, अशा अपेक्षा असतात. जर शेतकरी मुलगा लग्नासाठी चालत नाही तर मग मुलाकडे शेती असावी, अशी अपेक्षा का ठेवली जाते? हा यक्षप्रश्न असल्याचा सूरही व्यक्त होतो.

परंतु समाज मनात वाढीस लागत असलेल्या या मनोवृत्तीमुळे सधन शेतकरी अथवा बागायतदारांची मुले व स्वतः शेतीची कामे करणाऱ्या उपवर तरुणांचे विवाह होत नाहीत. या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी नाचणखेडा (ता. पाचोरा) येथील उपवर बागायतदाराने नवरदेवाचा पेहराव करत, कपाळावर मुंडावळ्या (बाशिंग) बांधून पाचोरा येथे केलेले अनोखे आंदोलन शहरवासीयांचे लक्ष वेधणारे ठरले आहे. या आंदोलनाची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे.

नाचणखेडा येथील पंकज राजेंद्र महाले हा उपवर बागायतदार शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या, वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन डोक्यावर टोपी, पांढरा गणवेश व कपाळी मुंडावळ्या बांधत आला व त्याने ‘बागायतदार आहे बागायतदारीण हवी’ असा फलक हातात घेऊन उंचावत अनोखे आंदोलन केले.

हा बागायतदार तरुण १० एकर बागायती शेतीचा मालक व पदवीधर असला तरी तो खेडेगावात वास्तव्यास आहे व त्याला नोकरी नाही म्हणून लग्नासाठी कोणी मुलगी मिळत नसल्याने त्याने अनोखे व लक्षवेधी आंदोलन केले.

आंदोलनाने सारेच विचारमग्न...

नवरदेवाच्या पेहरावात हातात फलक उंचावत बागायतदार तरुणाने केलेले हे अनोखे आंदोलन पाहून शहरवासीय प्रथम अचंबित झाले, परंतु या उपवर बागायतदाराच्या आंदोलनामागची भूमिका कळाल्यानंतर मात्र उपस्थित सारे भावूकही झाले. समाजात असलेले वास्तव या बागायतदार तरुणाने आंदोलनाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचा केलेला प्रयत्न खरोखरच साऱ्यांनाच विचारमग्न करणारा ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT