Kapdane: Officials of Rajaram Foundation honoring Padma Shri Rahibai Popere here on Saturday
Kapdane: Officials of Rajaram Foundation honoring Padma Shri Rahibai Popere here on Saturday esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शंभर वर्षे जगण्यासाठी विषमुक्त भाजीपाला पिकवा

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : दुर्गम भागात काम सुरू आहे. मी शाळेत गेली नाही. जायलाही मिळाले नाही. पण वडिलांनी घरीच जे शिकविले. ती जिवन जगण्याची कला होती. गरिबीत लाजायचे नाही. अविरत काम करीत राहिली. संकटे आलीत.

अन देशी वाणांकडे वळली. आज देशी एकशे चौदा वाण आहेत. शंभर वर्षे जगण्यासाठी विषमुक्त भाजीपाला पिकवा. अन्‌ शंभर वर्षे जगण्याचा सल्ला पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी दिला.(Padma Shri Popery say at inauguration of Rajaram Foundation Grow poison free vegetables to live for a hundred years Dhule news)

येथील स्वातंत्र्य सेनानी राजाराम फाउंडेशनच्या उद्‌घाटनप्रसंगी पद्मश्री पोपेरे मार्गदर्शन करीत होत्या. अध्यक्षस्थानी साहित्यिक रामदास वाघ होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते फाउंडेशनचे उद्‌घाटन झाले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, टिचर असोसिएशनच्या राज्यध्यक्षा शुभांगी पाटील, डॉ. जे. बी. पाटील, अर्जुन राऊत, अध्यक्ष पांडुरंग पाटील, उद्यानपंडित नथ्थू माळी, तापी खोऱ्‍याचे अभ्यासक भिला पाटील, अनंतराव पवार, राजेंद्र वाकडे, डिगंबर पाटील, नवल पाटील, सरपंच सोनीबाई भिल, धनूरचे सरपंच चेतन शिंदे, डोंगरगावचे सरपंच प्रकाश पाटील, साहेबराव पाटील, पी. बी. पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

५२ पिकांचे ११४ वाण

पद्मश्री बीजमाता पोपेरे म्हणाल्या, मला समाजात काम करायचे होते. पण परवानगी नव्हती. मोठा मुलगा दहावी झाला. परवानगी अन्‌ वेळही मिळाला. महिलांसाठी बचत गट सुरु केला. या बचत गटात तीन हजार महिला आहेत. ऊसतोडीसाठी स्थलांतरही व्हायचे. त्यानंतर मोठ्या जोमाने काम सुरु व्हायचे. गटातील महिलांना भेट म्हणून रोप वाटप सुरु केले. हायब्रीड खाल्याने कुटुंबाचे मोठे नुकसान होते. घरात आजार आले. हे लक्षात आल्यानंतर देशी वाण जतन करण्यास सुरवात केली. आज ५२ पिकांचे ११४ वाण आहेत.

हे देशी बियाणे बॅंकेत साठविले आहेत. जे जगातील कोणत्याही बियाणे बॅंकेत नाहीत. फाउंडेशनचे सर्वेसर्वा उमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दत्तात्रय पाटील यांनी तर राकेश पाटील यांनी आभार मानले. संदीप पाटील, अमोल देशमुख, संजय देशमुख, राजेंद्र पाटील, सुरेश पाटील, संजय देशमुख, जयवंत पाटील, रोशन पाटील, स्वप्नील पाटील आदींनी संयोजन केले.

"फाउंडेशनच्या माध्यमातून पदवीधर बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देतोय. मोठे सामाजिक काम उभे करायचे आहे. इस्त्रोतील शास्त्रज्ञ तथा येथील लेक अस्मिता पाटीलचा सन्मान करून तरुणांना प्रेरणादायी उदाहरण उभे केले आहे."

-उमेश पाटील, सचिव राजाराम फाउंडेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT