Palkhed dam water to be released from 15 november
Palkhed dam water to be released from 15 november 
उत्तर महाराष्ट्र

दिवाळीची गोड बातमी; पालखेड कालव्याचे आवर्तन १५ नोव्हेंबरपासून

सकाळवृत्तसेवा

येवला : येवलेकराना दिवाळीची गोड बातमी मिळाली असून दुष्काळात आधारासाठी ज्याची प्रतीक्षा होती ते पालखेड डावा कालव्याचे पिण्याचे व सिंचनाचे सोडण्याचा निर्णय झाला आहे.हे आवर्तन १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान सोडण्यात येईल तर दुसरे आवर्तन दुष्काळजन्य परिस्थिती नुसार ठरवले जाईल, असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

वितरिका ४६ ते ५२ वरील बंधारे पिण्याच्या पाण्याने भरण्यासाठी जिल्हाधिकार्याकडे ठराव पाठवा अश्या सूचनाही त्यांनी केल्या.

जामनेर येथे बाबा डमाळे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाजन यांची भेट घेऊन आवर्तनाची मागणी केली. पालखेड कालव्यात दोन पूर्ण क्षमतेने आवर्तने द्या अशी मागणी यावेळी डमाळॆ यांनी केली.पालखेडच्या कट मारलेल्या पाण्याची तूट भरून काढण्याकरता नारपार वळण बंधाऱ्यातून लिफ्टद्वारे पाणी मिळण्यासाठी सर्वेसाठी सहा कोटीची तरतूद केल्याबद्दल तसेच  पालखेड कालवा व चारी क्रमांक 46 ते 52 वरील बंधारे पिण्याच्या पाण्यासाठी भरून देण्याची मागणी मान्य केल्याबद्दल, जायकवाडीसाठी पालखेड- करंजवण धरणातील पाणी सोडण्याबाबत निर्णया बाबत यापूर्वीच मंत्री चंद्रकांत पाटील व महाजन यांची भेट घेऊन डमाळे यांच्या शिष्टमंडळाने जायकवाडीसाठी पाणी सोडू नये अशी प्रथम मागणी केली होती.

आजच्या भेटीत सदरहू मागणी मान्य करत येवल्याच्या हक्काचे पाणी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महाजन यांचे आभार मानून सत्कार या प्रसंगी शेतकरी प्रतिनिधीनी केला.

या शिष्टमंडळात उत्तर पूर्व भागातील गावातील लाभार्थी शेतकरी प्रमुख कार्यकर्त्यांसह अरुण देवरे,बाळासाहेब काळे, रामू भागवत, अमोल सोनवणे,आण्णासाहेब ढोले,जगदीश गायकवाड,गजानन देशमुख, दिलीप भागवत,भगवान सोनवणे, ठकचंद वरे,देवा भागवत,संतोष वलटे, आप्पासाहेब भागवत,संजय भागवत, बाबा शंकर सोनवणे, कपिल देशमुख, प्रकाश बजाज, शिवाजीराव ढोले,भरत बोंबले, डॉक्टर शरद काळे,अशोक थोरात, ज्ञानेश्वर वाळूज, अण्णा थोरात,नाना जगताप,अरुण शेळके,अरुण सोनवणे, भास्कराव शेळके,रवींद्र शेळके, विलास भागवत,कचरु चव्हाण,बाबासाहेब भागवत, रावसाहेब मगर,भाऊसाहेब भागवत, बाबासाहेब पवार आदिसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT