Parents are campaigning for Kunal Patil in Dhule lok sabha constituency 
उत्तर महाराष्ट्र

Loksabha 2019 : लेकासाठी सारं काही...; कुणाल पाटलांसाठी आई-वडील सरसावले

हर्षल भदाणे पाटील

लोकसभा 2019
धुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष रामराव भामरे आणि आमदार कुणाल रोहिदास पाटील हे एकमेकांसमोर रणांगणात उभे ठाकले असून दोघांमध्ये जोरदार चुरस रंगणार आहे.

कुणाल पाटील यांच्या आई लता पाटील या गावोगावी भेट देत आपल्या मुलासाठी मत मागत आहेत. तर दुसरीकडे रोहिदास पाटील यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठभेट घेत मुलासाठी जोर लावण्यास सुरवात केली आहे. 

कुणाल पाटील हे माजी खासदार चुडामण पाटील यांचे नातू आहेत. माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्यापेक्षा जास्त मताने निवडून येण्याचा विक्रम चुडामण आनंदा पाटील यांनी केला होता. चुडामण पाटील 1962 ते 1977 असा दिर्घकाळ सलग तीन वेळा ते खासदार म्हणून निवडूण गेले. 

  • मात्र चुलतभावाचा भाजपमध्ये प्रवेश -
    रोहिदास पाटील यांचे पुतणे आणि कुणाल पाटील यांचे चुलत भाऊ उत्कर्ष विश्‍वास पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशास संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे कारणीभूत असल्याचा काँग्रेस गटात उमटतोय. तर उत्कर्ष हे सहा महिन्यांपासून भाजप प्रवेशासाठी इच्छुक होते, असे भामरे समर्थक सांगत आहेत. एकूणच निवडणुकीपूर्वी डावपेचांसह निर्माण झालेल्या स्थितीमुळे मंत्री डॉ. भामरे- पाटील आणि कुणाल पाटील यांच्यात टोकाची लढत होणार असल्याचे वर्तविले जाते.
     
  • आई वडिलांची मेहनत सार्थकी लागणार का ?
    भामरेंचा पराभव करण्यासाठी तरुण उमेदवार पाहीजे, अशी कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याचे समजते आहे. मात्र कुणाल पाटील यांच्या साठी आई वडील घेत असलेली अथक मेहनत सार्थकी लागते का ?, आता हेच पहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT