Employees of Public Works Department during pen bandh protest on the premises of Collector Office on Monday.
Employees of Public Works Department during pen bandh protest on the premises of Collector Office on Monday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : PWDत लेखणीबंद आंदोलन; कार्यकारी अभियंत्यांविरुद्ध कमर्चाऱ्यांतर्फे ‘असहकार’चा इशारा

सकाळ वृत्तसेवा

धुळे : येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी आणि उपअभियंते, कर्मचाऱ्यांमधील संघर्ष शमण्याचे चिन्ह नाही. प्रशासकीय प्राधिकरणाकडून (मॅट) बदलीचा स्थगिती आदेश सौ. घुगरी यांनी मिळविल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. २) लेखणीबंद आंदोलन केले. त्यांनी मंगळवार (ता. ३)पासून असहकार आंदोलन पुकारणार असल्याचे निवेदन अधीक्षक अभियंता विवेक नवले यांनी दिले. (Pen ban movement in PWD Warning of non co operation by employees against executive engineers Dhule News)

सार्वजनिक बांधकाम विभागात आठवड्यापूर्वी उपअभियंते, कर्मचाऱ्यांनी सौ. घुगरी यांच्याविरोधात आंदोलन केले. विभागात सीसीटीव्ही लावणे यासह सौ. घुगरी यांच्याकडून उर्मट वागणूक दिली जात असल्याची तक्रार आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली.

त्यावर अशासकीय नागरिकांचा विभागातील कामकाजात हस्तक्षेप असल्याने सीसीटीव्ही लावले, तसेच अडीच वर्षांच्या कालावधीत कर्मचाऱ्यांची कुठलीच तक्रार नव्हती, मात्र मार्च जवळ येताच माझी अडचण का वाटू लागली, असा प्रश्‍न उपस्थित करत सौ. घुगरी यांनी विकासकामे वा कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविलेले नाही, फुगरी बिले अमान्य केल्याने व कुणाच्या तरी दबावाखाली आंदोलन होत असल्याची भूमिका मांडली होती.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

असे असताना सौ. घुगरी यांची महापालिकेत कार्यकारी अभियंतापदी बदली झाली. त्यावर त्यांनी ‘मॅट’कडून स्थगितीचा अंतरिम आदेश मिळविला. अशात कर्मचाऱ्यांनी पुन्हा सोमवारी आंदोलनाचे हत्यार उपसले. कार्यकारी अभियंत्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा यासह विविध घोषणा देत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अन्य अभियंते, कर्मचाऱ्यांनी काळी फिती लावत लेखणीबंद आंदोलन केले.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सौ. घुगरी मनमानी पद्धतीने कारभार करतात. गेल्या महिन्यात आंदोलनातून राज्य शासन व लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली. त्यामुळे सौ. घुगरी यांची येथील महापालिकेत बदली झाली. त्यांनी मॅटकडून तात्पुरती स्थगिती मिळविल्यावरही त्या विभागात कामकाज करीत आहेत.

शासकीय कामे सुरळीत होण्यासाठी सौ. घुगरी यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अन्यथा मंगळवारपासून असहकार आंदोलन करू, असा इशाराही उपविभागीय अधिकारी धर्मेंद्र झाल्टे, विनोद वाघ, किरण पाटील, डी. बी. हिरे, डी. पी. इसे, आर. जी. बागड, आर. एच. पाटील आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

CM Eknath Shinde : त्यांच्यासोबत पाकिस्तानची बोली बोलणारे बसतात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

SRH vs GT Live Score : हैदराबादमध्ये पुन्हा पावसाचं थैमान; नाणेफेकच काय सामन्यावरही दाटले ढग

SCROLL FOR NEXT