crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : पुढारपण करतात म्हणून एकाने चालवली तलवार; 2 गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : गावात पुढारपण करतात, असे धमकावत एकाने तलवारीने वार करत दोघांना गंभीर जखमी केले. वैजाली (ता. शहादा) येथील गजबजलेल्या बसस्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा हल्ला झाला.

शहादा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे.(person attacked with sword due to taking lead in village nandurbar crime news)

वैजाली (ता. शहादा) येथील बसस्थानक परिसर नेहमी गजबजलेला असतो. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक शांताराम बाजीराव धारपवार (रा. वैजाली) हा मोटारसायकलने आला.

त्याने दोघांना उद्देशून पुढारपण करतात, असे धमकावत असतानाच मोटारसायकलच्या सीटखालून तलवार काढली. क्षणाचाही विलंब न पानटपरीवर उभे दोघांवर तलवारीने हल्ला केला. त्यात राहुल संजय पाटील (रा. वैजाली) व रवींद्र बन्सीलाल चव्हाण (रा. नांदर्डे) यांच्या हातांवर तलवारीच्या वार करीत गंभीर दुखापत केली.

तलवारीने हल्ला झाल्याचे कळताच धावपळ उडाली. त्यामुळे गावात भीतीने वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही जखमींवर उपचार सुरू आहेत.

याबाबत राहुल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहादा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. हल्लेखोर धारपवार यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हवालदार रामा वळवी तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ohh Shit: रोहित शर्मा मॅच खेळत होता अन् 'तो' अचानक कोसळला; तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पळापळ झाली अन् सर्वच घाबरले

Railway Ticket Upgrade : स्लीपरच्या पैशात AC चा प्रवास! तेही एकही रुपया जास्त न देता? जाणून घ्या काय आहे रेल्वेचा ऑटो अपग्रेड नियम

New Year Trip Places : कमी खर्चात नव्या वर्षाची ट्रीप प्लॅन करताय? 'ही' आहेत 5 बेस्ट ठिकाणे..कमी पैशात डबल मजा

Pune: परवानगी नसेल तर सभा महागात पडणार अन्...; पुणे महापालिकेचे रॅली-सभांसाठी कडक नियम लागू

Capricorn Yearly Horoscope 2026: राहु, शनि आणि गुरु कसा बदलणार तुमचं आयुष्य; वाचा संपूर्ण वार्षिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT