Former Deputy Mayor Kalyani Ampalkar while asking the employees of the Hire Government Hospital for not receiving proper treatment for the woman who underwent maternity surgery. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : हिरे रुग्णालयात रुग्णांच्या जिवाशी खेळ!; आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

धुळे : येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप माजी उपमहापौर तथा भाजपच्या विद्यमान नगरसेविका कल्याणी अंपळकर यांनी केला. एका सीझेरियन झालेल्या महिलेला उपचाराअभावी प्रचंड त्रास सहन करण्याचा संतापजनक प्रकार येथे घडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. याप्रश्‍नी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. (play with lives of patients in hire hospital Warning of movement Latest Dhule News)

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

काही दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या प्रसूती विभागात सीझेरियन झालेल्या महिलेच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी श्रीमती अंपळकर रुग्णालयात गेल्या होत्या. त्या वेळी संबंधित महिलेच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी अत्यंत बेजबाबदारपणे टाके घातले होते, पाच ते सात दिवसांत ते टाके तुटले. त्यामुळे त्रास सुरू झाल्याने महिला पुन्हा रुग्णालयात आली. त्या वेळी तिच्यावर योग्य उपचार करण्याऐवजी केवळ कापसाचे बोळे लावून महिलेला दिवसभर कॉटवर पडू दिले. तिच्याकडे कोणीही लक्ष दिले नव्हते.

त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित महिलेच्या योग्य त्या उपचारासाठी व्यवस्था करण्याची विनंती केली. मात्र, प्रशासनातील आणि वॉर्डातील काही मंडळींनी महिलेला मदत करण्याऐवजी तिच्याशी वाद घातला, अरेरावी केल्याचे श्रीमती अंपळकर यांनी सांगितले. त्यामुळे संतप्त श्रीमती अंपळकर यांनी तेथील यंत्रणेची चांगलीच खरडपट्टी काढत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. अखेर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या महिलेवर उपचार सुरू केले.

हा सर्व प्रकार वॉर्डातील इतरही रुग्ण महिला आणि त्यांच्या नातेवाइकांनी पाहिल्यानंतर त्यांनीही श्रीमती अंपळकर यांच्याकडे अशा प्रकाराची आपबीती सांगितली. रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यासही सांगितले जाते. या सर्व प्रकारांबद्दल हिरे मेडिकलच्या प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारत रुग्णांशी चाललेला खेळ न थांबल्यास रुग्णालयात रुग्ण व नातेवाइकांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रीमती अंपळकर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT