crime
crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना पोलिसांचा दणका

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : गर्दीच्या ठिकाणी मुलींची किंवा महिलांची छेड काढण्याचे, तसेच रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी जाणाऱ्यांच्या मागून येत दुचाकीच्या सायलेन्सरचा जोरात आवाज करणे, शिवीगाळ करणे आदी प्रकारे टवाळखोरी करणाऱ्या नंदुरबार शहर व नंदुरबार तालुक्यातील, तसेच विसरवाडी येथील १७ युवकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.()

नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी पोलिस अधीक्षक पाटील यांनी टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुद्ध पोलिस ठाणेस्तरावर महिला पोलिस अधिकारी व महिला अंमलदार यांचे एक पथक तयार करून टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुद्ध कारवाई करणेबाबतचे आदेश सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते.

त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात, नंदुरबार शहर पोलिस ठाणे हद्दीतील नेहरू चौक, डी. आर. हायस्कूल परिसरात- आठ, उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील उड्डाणपूल, सिंधी कॉलनी परिसरात- पाच, नंदुरबार तालुका पोलिस ठाणे- दोन, विसरवाडी पोलिस ठाणे- दोन, असे एकूण १७ युवकांवर गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्ये टवाळकी करून मुलींची छेडछाड करणाऱ्या युवकांना, तसेच नागरिकांना त्रास देणाऱ्या टवाळखोर युवकांना संबंधित पोलिस ठाण्यालात आणून सक्त ताकीद देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

संबंधित युवकांनी यापुढे अशा प्रकारचे कृत्य केले, तर त्यांच्या पालकांना संबंधित पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना त्यांच्या पाल्याच्या कृत्याबद्दल समज देऊन त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. तसेच पुन्हा त्या युवकांनी तिसऱ्या वेळेस देखील अशा प्रकारचे कृत्य केले तर त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्ये करण्यापासून परावृत्त करावे, तसेच गर्दीच्या ठिकाणी मुलींची किंवा महिलांची छेड काढणारे व रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी जाणाऱ्यांच्या मागून येत दुचाकीच्या सायलेन्सरचा जोरात आवाज करणारे, शिवीगाळ करणाऱ्याची माहिती तत्काळ डायल-११२ वर द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.

''टवाळखोर युवकांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाणेस्तरावर दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आली असून, अशा टवाळखोर युवकांविरुद्ध कारवाई करणेबाबतचे आदेश सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहेत. संबंधित मोहीम यापुढे अजून प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.''- पी. आर. पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, नंदुरबार

महाविद्यालयीन परिसरात गस्ती आवश्‍यक

नंदुरबार शहरात रोडसोमियोंची टवाळकोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शाळा-महाविद्यालय परिसरात त्यांचा वावर वाढला आहे. डी. आर. हायस्कूल, श्रॉफ हायस्कूल, एकलव्य विद्यालय, नूतन विद्यालय, जी. टी. पाटील महाविद्यालय, आय. टी. आय आदी परिसरात नेहमी मोटारसायकलीवरून चकरा मारणारे दिसतात. तसेच खासगी शिकवणी सुरू असलेल्या परिसरातही टवाळखोरांचा

सुळसुळाट वाढला आहे. यातूनच दोन दिवसांत कॉलेज रस्त्यावर दोन मोठी भांडणे झाली. त्यामुळे पूर्वीप्रमाणे दामिनी पथक कार्यान्वित करून महाविद्यालयीन परिसरात त्यांना गस्तीची जबाबदारी द्यावी, अशी अपेक्षा शाळा-महाविद्यालयीन शिक्षक-प्राध्यापक व पालकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT