Police Department
Police Department esakal
उत्तर महाराष्ट्र

Police Department Information : आधुनिक, तांत्रिक कार्यपद्धतींचा वापर पोलिस दलासाठी आवश्यक

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : देशाच्या अंतर्गत सुरक्षेत पोलिस दलाचा महत्त्वाचा वाटा आहे. पोलिस दलाची स्थापना झाल्यापासूनच्या गुन्ह्यांची उकल करण्याची पद्धतदेखील बदलत गेली.

काळानुरूप फक्त गोपनीय बातमीदारांवर, खबऱ्यांवर विसंबून न राहता आधुनिक काळात वाढत जाणाऱ्या विविध तांत्रिक गुन्ह्यांकरिता पोलिस दलाला विविध आधुनिक व तांत्रिक कार्यपद्धतींचा वापर करणे आवश्यक होत चालले आहे. (Police Department Information use of modern technological procedures is essential for police force Nandurbar News)

"चोरी, खून, दरोडे, खंडणी यांसारख्या पारंपरिक गुन्हे करणाऱ्या आरोपींना त्यांच्या गुन्हे करण्याच्या पद्धतींवरून पकडणे सहज शक्य नसले तरी वाटते एवढे कठीणही नाही; परंतु वाढत चाललेल्या सायबर किंवा इतर तंत्रज्ञानाशी निगडित गुन्हेगारांचा माग काढणे, त्यांना पकडणे कठीण होत चालले आहे."

पी. आर. पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, नंदुरबार

पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाबरोबरच महाराष्ट्र पोलिस दल हे सर्वसामान्य जनतेला आपलेसे कसे वाटेल? याकरिता विविध पथदर्शी प्रकल्पांचा वापर पोलिस दलात करण्यात येतो. आज रोजी नंदुरबार जिल्हा पोलिस दल वापरत असलेल्या विविध तांत्रिक पद्धतींबाबत जाणून घेणे क्रमप्राप्त आहे.

१) आरएफआयडी (RFID) प्रणाली :

पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत आरएफआयडी (RFID) पोलिस प्रणाली असलेली यंत्रणा पुरविण्यात आलेली आहे. पोलिस ठाणे हद्दीतील महत्त्वाची ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, मिश्र वस्तीची ठिकाणे, संवेदनशील भाग, एटीएम, सराफ बाजार, बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ, तसेच गर्दीच्या ठिकाणी RFID प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

रात्रगस्त पेट्रोलिंगदरम्यान या प्रणालीचा वापर पोलिस ठाण्याकडून होत असतो. RFID यांना रात्रगस्तीसाठी नेमून दिलेल्या ठिकाणी त्यांच्यावर प्रभारी अधिकाऱ्यांना नियंत्रण करणे शक्य होते.

२) डायल ११२ :राज्यातील नागरिकांना एकाच वेळी सर्व प्रकारची ११२ या योजनेची सुरवात करण्यात आली. यामध्ये तक्रारदार व्यक्तीची तक्रार सर्वप्रथम नवी मुंबईतील केंद्राला जाते. तेथून ती तक्रार तक्रारदाराच्या पोलिस मार्शलला कळविली जाते.

त्यानंतर अवघ्या तीन ते चार मिनिटांच्या आत पोलिस मदत संबंधित तक्रारदाराला प्राप्त होते. पूर्वीच्या डायल १०० या क्रमांकामुळे तक्रारदाराचे लोकेशन प्राप्त नसल्याने पोलिस मदत तत्काळ पोचविण्यात अडचण येत असे.

या प्रणालीत तक्रारदाराचा मोबाईल क्रमांक व लोकेशन मिळत असल्याने तत्काळ तक्रारदाराजवळ पोचणे शक्य होते. जिल्ह्यातील ३७ चारचाकी वाहनांवर व २२ दुचाकी वाहनांवर MDSL या कंपनीमार्फत MDT (Mobile Data Terminal) ही यंत्रणा यासाठी कार्यान्वित करण्यात आली असून, २४x७ कार्यरत असते. पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षामार्फत त्यावर पर्यवेक्षण केले जाते.

३) CCTNS (Crime & Criminal Tracking Network System) :

CCTNS प्रणालीची सुरवात महाराष्ट्रात २०१५ पासून सुरू असून, CCTNS प्रणालीत पोलिस ठाणे स्तरावर होणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ऑनलाइन नोंद घेण्यात येते. देशातील विविध भागातील वेगवेगळे गुन्हे करणारे गुन्हेगार, विविध ठिकाणी बेवारस मिळून आलेल्या मालमत्ता (वाहने), अनोळखी बेवारस मृतदेह याबाबत माहिती CCTNS प्रणालीमुळे शक्य झाले आहे.

ICJS (Inter-Oprable Criminal Justice System) ही CCTNS प्रणालीतील महत्त्वाची सुविधा असून, या सुविधेमुळे देशभरातील गुन्हेगारांची कुंडली पोलिस विभागाला तत्काळ उपलब्ध होत आहे.

नंदुरबारसारख्या अतिदुर्गम किंवा आदिवासी जी CCTNS प्रणाली राबवून ती यशस्वी करणे नंदुरबार जिल्हा पोलिस दलासाठी आवाहन होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कारण नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, मोलगी, अक्कलकुवा व इतर ग्रामीण भागात इंटरनेटची वेगमर्यादा नंदुरबार जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यांपेक्षा कमी असते. त्यातच वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा अशा अनेक अडचणींवर मात करून पोलिस प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजाची दिलेल्या विहित वेळेत व जास्तीत जास्त ऑनलाइन फीडिंग करून नंदुरबार जिल्हा CCTNS टीमने, गुन्हे अन्वेषण विभागाने राज्यात ५३ घटकांच्या जाहीर केलेल्या गुणांकनात कायमच पहिल्या पाच घटकात स्थान मिळविले आहे.

४) सायबर गुन्हे शाखा ः

काळाबरोबरच गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धतदेखील बदलत चालली आहे. कमी कष्टात जास्त पैसा मिळविण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून विविध प्रकारच्या फसवणुकीच्या तंत्रांचा वापर केला जातो. ज्यात फिशिंग, फ्रॉड कॉल, नोकरीचे, लोन अॅप, सेक्टॉर्शन, मॅट्रोमोनियल फ्रॉड यांचा समावेश होतो. या सर्व आधुनिक ठगांशी लढण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलिस दलाकरिता आधुनिक सायबर गुन्हे शाखा तयार करण्यात आली आहे. या शाखेतील अंमलदारांना वेळोवेळी अत्याधुनिक तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच आवश्यक असलेली आधुनिक संसाधने दिली जातात. त्यामुळे सायबर गुन्ह्यांशी लढा देणे सहज शक्य झाले आहे.

५) सोशल मीडिया सेल :

नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या सायबर शाखेंतर्गत काम करणारा सोशल मीडिया सेल स्वतंत्र विभाग आहे. नंदुरबार शहराला असणाऱ्या जातीय घटनांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया सेलच्या कामास अनन्यसाधारण महत्त्व आहे.

देशभरात घडणाऱ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक तसेच जातीय घटनांचा नकारात्मक प्रभाव जिल्ह्यात पडून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून अशा घटना शोधून वेळीच उपाययोजना करणे शक्य होते.

फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम या प्रकारच्या विविध समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या बातम्या, व्हिडिओ, पोस्ट, स्टेटस, लेख यांच्यावर कटाक्षाने लक्ष ठेवून त्यातील आक्षेपार्ह बाबींवर तातडीने कायदेशीर कारवाई करणे सोशल मीडिया सेलमुळे शक्य होते.

६) AMBIS (Automated multimodal Biometric Identification System) :

गुन्हेगाराला एखाद्या गुन्ह्यात अटक झाल्याने पुढील काळात त्याची माहिती तत्काळ होण्यासाठी त्याच्या हाताचे व बोटांचे ठसे घेतले जात असत. सध्या AMBIS पद्धतीने ठसे घेणे शक्य होत आहे. ज्यातून एखाद्या व्यक्तीस अटक केल्यानंतर त्यास पूर्वी देशभरातील कोणत्या ठिकाणी अटक केली होती अगर कसे, याबाबत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. त्यामुळे आरोपीने कितीही त्याचा पूर्वेतिहास लपविला तरी तो तपास यंत्रणेसमोर येतो.

७) बॉम्बशोधक व नाशक पथक (BDDS- Bomb Detection And Disposal Squad) :

नंदुरबार जिल्हा घटकात सण, उत्सव, संरक्षित किंवा अति संरक्षित व्यक्तीच्या दौऱ्याच्या वेळी, तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे नंदुरबार जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण, रेल्वेस्थानक, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी बॉम्बशोधक व नाशक पथक त्यांच्याकडील आधुनिक साधनसामग्रीने तपासणी करीत असते.

८) मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन :

नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडणारे मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी इत्यादी तसेच शरीराविरुद्ध घडणारे खून, बलात्कार, लैंगिक अत्याचार, खुनाचा प्रयत्न इत्यादी ठिकाणच्या घटनास्थळावर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमार्फत भेट देऊन फॉरेन्सिक व्हॅनवर काम करणाऱ्या तज्ज्ञ व प्रशिक्षित अंमलदारांमार्फत घटनास्थळावरील महत्त्वाचे भौतिक पुरावे गोळा केले जातात. तसेच इतर तांत्रिक पद्धतींचा वापरही गुन्ह्यांची उकल करण्याकरिता करण्यात येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT