police saved child under operation muskan 11 esakal
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार : पोलिसांना 198 बालकांना शोधण्यात यश

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : पोलिस दलाने जूनमध्ये जिल्ह्यात राबविलेल्या मुस्कान-११ या मोहिमेत पालक व घरापासून दुरावलेल्या (Absconded) १९८ बालकांना शोधून (Found) त्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात यश आले. (Police find 198 children under operation muskan 11 Nandurbar news)

जून २०२२ मध्ये महाराष्ट्रासह जिल्ह्यात ‘ऑपरेशन मुस्कान-११’ राबविण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यात ‘ऑपरेशन मुस्कान ११’ राबविण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखांना सूचना देऊन मार्गदर्शन केले. बालकल्याण समिती, बालसंरक्षण गृहे, अशासकीय संस्था व बालपोलिस पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. प्रत्येक पोलिस ठाण्याचे एक अधिकारी व चार अमलदार पथकात होते. संपूर्ण मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील रेल्वे व बसस्थानके, धार्मिक स्थळे, हॉटेल, ढाबे याठिकाणी काम करणारे बालके, भिक्षा मागणारी बालके, तसेच कचरा गोळा करणाऱ्या बालकांचा शोध घेतला.

पोलिस ठाणेनिहाय मिळून आलेली बालके अशी ः नंदुरबार शहर पोलिस ठाणे-१४ बालके व बालिका, नंदुरबार तालुका पोलिस ठाणे- ११ बालके व १ बालिका, उपनगर पोलिस ठाणे-१२ बालके व ५ बालिका, विसरवाडी पोलिस ठाणे- १२ बालके व ३ बालिका, नवापूर पोलिस ठाणे- १४ बालके व ४ बालिका, शहादा पोलिस ठाणे-३ बालके व ३ बालिका, सारंगखेडा पोलिस ठाणे- १२ बालके व ११ बालिका, म्हसावद पोलिस ठाणे- २० बालके व ५ बालिका, धडगाव पोलिस ठाणे- १० बालके व १ बालिका, तळोदा पोलिस ठाणे- ९ बालके व १ बालिका, अक्कलकुवा पोलिस ठाणे- १४ बालके व ३ बालिका, मोलगी पोलिस ठाणे- ५ बालके व १ बालिका, असे एकूण १४१ बालके व ४३ बालिकांचा शोध घेतला. त्यांच्या पालकांना बोलावून, त्यांचे समुपदेशन करून शिक्षण व बालहक्कांची माहिती दिली. तसेच ती मुले पालकांच्या ताब्यात दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे असई धात्रक यांच्या नेतृत्वात नेमलेल्या विशेष पथकाने जिल्ह्यातील सर्व शहरांना भेटी देऊन एकूण १४ अल्पवयीन बालकांचा शोध घेतला. त्यांचे पालक व संबंधित हॉटेल चालकांना कायद्याची समज दिली. पालक नसलेल्या बालकांना बालसंरक्षणगृहात पाठविण्याची दक्षता घेऊन मोलाची कामगिरी बजावली. या मोहिमेत जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT