Navapur news
Navapur news  esakal
उत्तर महाराष्ट्र

चक्क पोलिसांनी दिली स्मशानभूमीला लाकडे भेट; वाचा नेमकं काय घडलं

सकाळ वृत्तसेवा

नवापूर : स्मशानभूमीला पोलिस अधीक्षकांनी चार टन लाकडे दिली. ‘सकाळ’मधील वृत्त वाचून पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी गुरुवारी (ता. १६) नवापूर पोलिस ठाण्याच्या सहकार्याने अमरधाममध्ये चार टन लाकडे उपलब्ध करून दिली.

हेही वाचा: संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

या आठवड्यात नवापूर अमरधाममध्ये लाकडे नसल्याने एकाच दिवशी तीन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आल्याने या विषयाला वाचा फुटली. पालिकेने लाकडे मागविली होती, मात्र काही तांत्रिक कारणास्तव लाकडाचे वाहन आले नाही. तिन्ही मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांनी लाकडे आणून अग्निडाग दिला होता. परवा भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावित यांनी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या स्मरणार्थ पाच टन लाकडे अमरधामला दिली. या वृत्ताची दखल घेत पोलिस अधीक्षकांनीही लाकडे दिली.

मृतदेहांची हेळसांड होत असल्याने मृतांच्या नातेवाइकांसोबतच नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत होता. प्रसारमाध्यमांतून याबाबत वृत्त समजताच नंदुरबारच्या जिल्हा पोलिसप्रमुखांनी नवापूर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना तातडीने हालचाल करण्याच्या सूचना दिल्या.

पोलिस अधीक्षकांसह नवापूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून सुमारे चार टन लाकडे उपलब्ध करून दिली. नवापूर परिसरात लाकडे उपलब्ध नसल्याने लगतच्या गुजरातमधून पोलिसांनी लाकडे उपलब्ध करून दिली हे विशेष. नंदुरबार पोलिसांनी मानवाच्या अंतिम प्रवासादरम्यान असा वेगळा माणुसकीचा धर्म निभावला आहे. पोलिसांतील या जिवंत माणुसकीचे दर्शन झाले. पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, उपअधीक्षक सचिन हिरे, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे या पोलिस टीमने आपले कर्तव्य असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा गोत्यात! भाजप मुद्दा पेटवणार, जयराम रमेश यांची सारवासारव

वाढदिवस साजरा करुन परतताना काळाचा घाला! तासगाव-मणेराजुरी मार्गावर कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील 5 जण ठार

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात महिला मतदारांची बाजी

Share Market Today: आज शेअर बाजारात कोणते शेअर्स खरेदी कराल? कशी असेल बाजाराची स्थिती?

Cucumber Sandwich Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा काकडीचे चवदार सॅंडविच, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT