police help woman in night dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : ‘त्यांना’ पोलिसांमध्ये देवाची आली अनुभूती..! महिला सुरक्षित पोचली घरी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : ‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलिसांचे ब्रीद खरोखर किती समर्पक आहे याचा प्रत्यय येथील मीनाक्षी मुरलीधर मिस्तरी या महिलेला आला.

मध्यरात्री घाबरलेल्या अवस्थेत स्वतःच्या दोन मुलींसोबत पोलिसांच्या मदतीने सुरक्षित स्वतःच्या मामांच्या घरी पोलिस वाहनातून पोचल्यानंतर त्यांना पोलिसांमध्ये प्रत्यक्ष देवाची अनुभूती दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.(police help woman in night dhule news)

येथील माहेरवाशीण असलेल्या व सध्या साक्रीतच वास्तव्यास असलेल्या मीनाक्षी मुरलीधर मिस्तरी आपल्या दोन मुलींसोबत मंगळवारी कामानिमित्त धुळे येथे गेल्या होत्या. तेथून परतत असताना त्यांना रात्री वेळेत एसटी बस न मिळाल्याने मध्यरात्री उशिरा बाराच्या सुमारास त्या साक्री येथे पोचल्या.

एवढ्या मध्यरात्री काळोखात त्यांना कुठे जावे हे कळत नव्हते. त्यांचे मामा प्रकाश मिस्तरी शहरातील कोकणी कॉलनी येथे राहतात; परंतु त्यांच्या घराचा पत्ता त्यांना नेमका माहीत नव्हता व रात्रीच्या अंधारात रस्तादेखील लक्षात येत नव्हता. अशा भांबावलेल्या व घाबरलेल्या अवस्थेत मीनाक्षी मिस्तरी दोन्ही मुलींसोबत थेट पोलिस ठाण्यात पोचल्या.

या ठिकाणी पोलिस निरीक्षक मोतीराम निकम उपस्थित असताना त्यांना भेटून त्यांच्याकडे मदत मागितली. पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांनीदेखील मीनाक्षी मिस्तरी यांना धीर देत त्यांना शांत केले व स्वतःच्या वाहनातून सोबत महिला पोलिस यांना पाठवत त्यांच्या मामांचे घर शोधत त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोचविले.

मध्यरात्री पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांच्या मदतीने स्वतःच्या मुलींसह सुखरूप घरी पोचलेल्या मीनाक्षी मिस्तरी सकाळी पोलिस ठाण्यात येथे येत पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांच्यासह पोलिसांचे आभार व्यक्त केले. या वेळी पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना त्या अतिशय भावुक झाल्या होत्या.

''पोलिस बांधव हे प्रत्येक नागरिकाचे रक्षणकर्ते असल्याने याच भावनेतून रात्री घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांची मदत घेतली. महिलांच्या बाबतीतील आजूबाजूची परिस्थिती पाहता एकटी महिला सोबत मुली असताना प्रचंड भीती वाटत होती.

मात्र पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांच्यासह पोलीस बांधवांच्या आधारामुळे मध्यरात्रीदेखील मी सुखरूप माझ्या मामांच्या घरी पोचले.''-मीनाक्षी मिस्तरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोनालिसाचं जगप्रसिद्ध पेंटिग असलेल्या संग्रहालयात दरोडा; ४ मिनिटात नेपोलियाच्या ९ वस्तूंची चोरी, राणीचा मुकूट सापडला

खासदार बाबा की अभिनेत्री आई ? कोणाकडून वारशाने बाळाला मिळणार जास्त प्रॉपर्टी

Ravindra Dhangekar On Murlidhar Mohol: पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेवरून नवा वाद पेटला | Sakal News

Karad Crime: 'कऱ्हाडजवळ तिन पिस्टलसह तिघेजण ताब्यात'; साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त, कऱ्हाड पाेलिसांची कामगिरी

Diabetes Causes India: भारतातील मधुमेहाची कारणे अन् उपाय, संशोधनात माहिती समोर

SCROLL FOR NEXT