Police Inspector Ravindra Kalamkar of Nandurbar City Police Station and his team along with the seized report. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : चोरीच्या ॲपेरिक्षासह संशयित ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : येथील जिल्हा रूग्णालय परिसरात रिक्षा (Rickshaw) पार्किंग केलेली असताना चोरट्याने ती लांबविली होती. (Police Inspector City arrested thief along with rickshaw within 12 hours through his team nandurbar news)

नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांच्या पोलिस पथकाच्या माध्यमातून १२ तासाच्या आत रिक्षासह चोरट्याला जेरबंद केले आहे.

दरीपाडा पोस्ट आमरपाटा (ता. साक्री, जि. धुळे) येथील रमेश मगन कुवर, (वय ३६) रिक्षाचालक नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आले असता त्यांनी (जीजे-१९-०२९३ ) ही जिल्हा रुग्णालयाचे गेट समोर पार्क केली होती. १४ फेब्रुवारीला दुपारी दोनच्या सुमारास चोरट्यांनी ती लांबविली. शुक्रवारी (ता. १७) नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात रमेश कुवर यांनी तक्रार दिली.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, नंदुरबार उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दोन पथके तयार केली. पातोंडा ते होळ रस्त्यालगत पथकाने विजय जयंता वळवी, (वय २३ वर्षे, रा. खडकी, ता. अक्कलकुआ) यांना रिक्षासह ताब्यात घेतले. त्याने चोरीची कबुली दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी 'सुपर डान्सर चॅप्टर ५' मध्ये आदितीला दिला खास पाठिंबा

SCROLL FOR NEXT