Police recruitment esakal
उत्तर महाराष्ट्र

Police Recruitment : पोलिसभरती लेखी परीक्षा; अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्हा पोलिस शिपाई भरती २०२१ च्या प्रक्रियेची लेखी परीक्षा रविवारी (ता. २) सकाळी पोलिस मुख्यालयाच्या पोलिस कवायत मैदानावर झाली. परीक्षार्थींना ए, बी, सी, डी प्रश्नपत्रिका संच देण्यात आला होता. (Police Recruitment Written Exam Final answer sheet published dhule news)

लेखी परीक्षेतील प्रश्नांसंदर्भात उमेदवारांना सोमवारी (ता. ३) सायंकाळी सहापर्यंत आक्षेप तसेच तक्रारी नोंदविण्याबाबत कळविण्यात आले होते. त्या अनुषंगाने काही उमेदवारांनी लेखी परीक्षेतील प्रश्नांसंदर्भात काही आक्षेप व तक्रारी ई-मेल तसेच अर्जाद्वारे केल्याने त्याचा सांगोपांग विचार करून सुधारित अंतिम उत्तरतालिका पोलिस मुख्यालयाच्या नोटीस बोर्डावर तसेच धुळे जिल्हा पोलिस दलाच्या https://panel.dhulepolice.gov.in/uploads/news/२३०४०३१९५८५४.pdf संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यालयाचे पोलिस उपअधीक्षक संभाजी पाटील यांनी दिली.

दरम्यान, जिल्हा पोलिस दलात दाखल होऊ इच्छिणाऱ्या ५०५ उमेदवारांनी रविवारी लेखी परीक्षा दिली. परीक्षा पारदर्शक पार पडण्यासाठी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड लक्ष ठेवून होते. परीक्षेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी २० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. एकूण ४२ जागांसाठी ही परीक्षा झाली. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शारीरिक चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या तृतीयपंथी उमेदवार चांद तडवी यांनीही लेखी परीक्षा दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT