Police seize Rs 1 lakh worth foreign liquor Nandurbar News esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar | पोलिसांनी पकडली 1 लाखाची विदेशी दारू

विनायक सुर्यंवशी

नवापूर (जि. नंंदुरबार) : पोलिसांनी शहरातील लाईट बाजार भागात एका चारचाकी वाहनातून विनापरवाना गुजरात (Gujarat) राज्यात अवैधरित्या विक्री (Liquor Illegal sale) करण्याच्या उद्देशाने घेऊन जाणाऱ्या विदेशी दारू (Foreign Liquor) साठ्यावर कारवाई केली आहे. ५७ हजाराचा मद्यसाठा व ७५ हजाराचे वाहन असा एक लाख ३२ हजाराचा मुद्देमाल पकडण्यात आला आहे.

चेतन सुरेशभाई मिस्तरी ( राहणार आयोध्या नगर भरूच, गुजरात ) चार चाकी वाहन (क्रमांक जीजे ०५ पीपी ५८७० ) या वाहनाची पोलिसांनी शहरातील लाईट बाजारात झेन कारची तपासणी केली. या वाहनात ५७ हजार सहाशे रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा आढळून आला. ७५ हजार रुपये किमतीची गोल्डन रंगाची झेन चार चाकी वाहन असा एकूण एक लाख ३२ हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चेतन सुरेशभाई मिस्‍तरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, हेडकॉन्स्टेबल राजेंद्र सोनवणे, कैलास तावडे, पंकज सुर्यवंशी, विकी वाघ आदींच्या पथकाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT