Child Marriage
Child Marriage esakal
उत्तर महाराष्ट्र

Child Marriage : ऑपरेशन अक्षताची गाव पातळीवर जनजागृती; बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : बालविवाहांना प्रतिबंध करणे तसेच महिलांविषयक कौटुंबिक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन अक्षता हा उपक्रम ८ मार्चपासून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे सुरु करण्यात आला आहे. (Police success in preventing 19 child marriage nandurbar news)

नंदुरबार जिल्ह्यातील ६३४ ग्रामपंचायतींपैकी ६३१ ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आले आहेत. तसेच, उर्वरित ३ ग्रामपंचायतींचे ठराव देखील लवकरच घेण्यात येतील. त्याचप्रमाणे आजपर्यंत नंदुरबार जिल्हा पोलिसांनी एकूण १९ बालविवाह रोखण्यात पोलीसांना यश आले आहे.

ऑपरेशन अक्षता या उपक्रमांतर्गत पोलिस ठाणे स्तरावरील अक्षता सेलच्या सदस्य असलेले गाव पातळीवरील महत्त्वाचा घटक म्हणजे पोलिस पाटील यांची ऑपरेशन अक्षताहा उपक्रम सुरु झाल्यापासून दर मंगळवारी बैठक घेण्यात येत असते. नंदुरबार जिल्ह्यातील पोलिसपाटील यांच्यामार्फत १२० बैठका घेण्यात आलेल्या आहेत.

तसेच पुढील काळात पोलिस ठाणे येथे घेण्यात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारच्या बैठकीत स्तरावरील अक्षता सेलचे सदस्य असलेले ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पोलिसपाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व बीट अंमलदार यांच्या देखील बैठका घेण्यात येणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच, पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी किंवा दुय्यम पोलिस अधिकारी पोलिस ठाणे हद्दीत दररोज एका गावाला भेट देऊन गावातील नागरिकांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून जनजागृती करण्यात येत आहे.

७८ गावांना भेटी

जिल्ह्यातील नंदुरबार शहर-०२, नंदुरबार तालुका-१०, उपनगर-०६, नवापूर-०६, विसरवाडी-०६, शहादा-०८, धडगाव-०६, सारंगखेडा-०६, म्हसावद-०७, अक्कलकुवा-०७, तळोदा-०८, मोलगी-०६ पोलिस ठाणे हद्दीतील एकूण ७८ गावांना भेटी देऊन ऑपरेशन अक्षता या उपक्रमाची जनजागृती बाबत माहिती देण्यात आली आहे.

या उपक्रमासाठी ९०२२४५५४१४ हा हेल्पलाइन नंबर जिल्हा पोलिस दलाकडून सुरु करण्यात आला आलेला आहे याबाबत देखील नागरिकांना बैठकांमध्ये सांगण्यात येत असते व कोणत्याही गावात बालविवाह होत असल्यास त्याबाबत हेल्पलाइन नंबरवर तत्काळ संपर्क करून माहिती देणेबाबत आवाहन करण्यात येत असून सदरच्या हेल्पलाईनवर तक्रारी प्राप्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT