Postal Box News esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : मोबाईल क्रांतीमुळे टपालपेटीचा रंग फिकट

सकाळ वृत्तसेवा

कळंबू : सध्याचे युग संगणकाचे आहे. एकमेकाच्या संवादासाठी आता मोबाइलची क्रांती झाली आहे. आधुनिक संदेशवहनासाठी पूर्वीच्या पत्राची जागा आता ईमेल, मेसेज, व्हॉट्सॲपने घेतली आहे.

दूरवरचा प्रवास घडून हाती पडलेल्या पत्रासाठी आतुरतेने वाट पाहणारे बसल्या जागी एकमेकांशी संवाद साधत आहेत. कुठेतरी गल्लीबोळात गर्दीच्या ठिकाणी लाल रंगाची पत्रपेटी आता दिसेनाशी झाली आहे.

गतिमान युगात याची जागा आता मोबाईल आणि संगणकाने घेतली आहे. आजघडीला तार, पत्र बंद, पोस्टाने येणारे भेटकार्ड जवळपास बंदच झाले आहे. पत्रांमधील प्रेमभाव, आदर, आपल्या लेखनातून होणारी देवाणघेवाण मोबाईल आणि संगणकाच्या कळफलकावर आली आहे. यामुळे लेखनाचा सराव थांबलाच म्हणायला हरकत नाही. (Post office boxes on verge of extinction in digital age Nandurbar News)

पूर्वीच्या काळी पोस्टमन दादा दिसले की आमचे काही आले का? असे त्यांना विचारले जायचे, तसेच पूर्वीच्या काळी गावात पत्र वाचणारे आणि लिहिणाऱ्यांची मोजकीच संख्या असायची. पत्र आले की त्यांच्याकडे जाऊन आपले निरोप, खुशाली सांगून पत्राद्वारे पाठवत असत. आज काळ बदलला आहे. प्रगती होत परस्पर संवादाची साधने बदलली.

शिक्षण आणि तंत्रज्ञानाने क्रांती घडवत सर्वांचे जीवन बदलले. खेडोपाड्यात पत्रपेटीसाठी लाल डबा लटकलेला असायचा, आता मात्र तो कुठेही दिसेनासा झाला आहे. खाकी पोशाखातील पोस्टमन यातील सारी पत्रे गोळा करून पुढे पाठवत असे. आजही ज्या ठिकाणी तंत्रज्ञान पोचले नाही, आशा तुरळक ठिकाणी याचाच वापर होत आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

त्या वेळी येणाऱ्या आणि जाणाऱ्या पत्राची उत्सुकता लागून असायची. आज मात्र तंत्रज्ञानाच्या युगात हा पत्रप्रपंच काहीसा दुरावला आहे. पूर्वीच्या काळात तंत्रज्ञानाची फारशी प्रगती झालेली नव्हती. दूरवरच्या संवादासाठी पत्र हेच एकमेव साधन होते. आपत्कालीन प्रसंगी तार, टेलिग्रामचा उपयोग व्हायचा. सध्याच्या डिजिटल युगात या मध्ये खूप बदल झाले आहेत. बसल्या जागी मोबाईलच्या मदतीने जगातील कान्याकोपऱ्यापर्यंत थेट संवाद साधला जात आहे. ही सारी आधुनिक प्रगतीची किमया आहे.

पत्राला महत्त्व लुप्त

पूर्वी पत्राला खूप महत्त्व होते, त्यामुळे नोकरभरती किंवा सुखदुःखाचे सर्व निरोप हे पत्राद्वारेच मिळायचे. त्यात लग्नपत्रिकेपासून तर नोकरभरतीची ऑर्डर, न्यायालयात चालू असलेल्या खटल्याच्या नोटिसा, मनिऑर्डर, सर्व प्रकारचे निरोप पोस्टमनदादामार्फत मिळत असत; परंतु आता व्हॉट्सॲप, ई-मेल, फेसबुक या माध्यमांद्वारे काही क्षणातच सुखदु:खाचा निरोप संबंधित नातेवाइकापर्यंत पोचत असल्याने आता टपालपेटी दिसेनाशी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Wagholi Accident : वाघोलीत थांबलेल्या ट्रकला धडक; सेफ्टी लाइट नसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार!

Latest Marathi Breaking News Live Update : पाणी भरण्याच्या वादावरून महिलेने केली शेजाऱ्याची हत्या

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

SCROLL FOR NEXT