Shirpur: Khandesh Sahitya Sangh Taluka President K. B. blacksmith Neighbors Subhash Ahire, Jagdish Devpurkar, Dr. Sadashiv Suryavanshi, Sarika Randhe, Dr. Phula Bagul etc
Shirpur: Khandesh Sahitya Sangh Taluka President K. B. blacksmith Neighbors Subhash Ahire, Jagdish Devpurkar, Dr. Sadashiv Suryavanshi, Sarika Randhe, Dr. Phula Bagul etc esakal
उत्तर महाराष्ट्र

Ahirani Sahitya Sammelan : अहिराणीना डंका देसमा वाजाडना शे! खानदेश साहित्य संघाला निमंत्रण

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : आपली अहिराणी भाषाना डंका मराठी मुलुखमा वाजनाच, पण आते तो देसमा वाजाडना शे. म्हणीसन बठ्ठास्नी अहिराणी साहित्य संमेलनले येवालेच जोयजे...अशा शब्दांत सहाव्या अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रमेश बोरसे यांनी येथील खानदेश साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले.

रमेश बोरसे यांनी शुक्रवारी (ता.६) सायंकाळी संघाचे तालुकाध्यक्ष के. बी. लोहार यांच्या घरी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुभाष अहिरे, खानदेश साहित्य संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सदाशिव सूर्यवंशी, कवी जगदीश देवपूरकर, रत्ना पाटील, सारिका रंधे, एम. के. भामरे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. फुला बागूल, प्रवीण माळी, अरविंद भामरे, सिकंदर शेख, प्रा. वाय. डी. बेडिस्कर, एन. एच. महाजन, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.(President of Ahirani Sahitya Sammelan Ramesh Borse invite office bearers of Khandesh Sahitya Sangh Dhule News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

पदाधिकाऱ्यांनी मनोगतातून अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी प्रचार व प्रसारासाठी आगामी काळात संमेलनाच्या माध्यमातून करावयाच्या प्रयत्नांची माहिती दिली. सहाव्या संमेलनासाठी शिरपुरातील साहित्य परिवारातर्फे संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.

जगदीश देवपूरकर, भामरे, सूर्यवंशी, प्रवीण माळी, लोहार, श्रीमती रंधे व अहिरे यांनी विविध विषयांवर मते मांडली. शिरपूर संघातर्फे संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रमेश बोरसे यांचा सत्कार करण्यात आला. श्री. बोरसे यांनी सत्काराला उत्तर देतांना अहिराणीच्या संवर्धनासाठी त्या भाषेतून साहित्य निर्मितीला उत्तेजन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. के. बी. लोहार यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT