उत्तर महाराष्ट्र

मालमत्ता, पाणीपट्टीसाठी जुन्या नोटा चालणार

सकाळवृत्तसेवा

नाशिक - पाचशे व हजाराच्या नोटा बंद करण्याची घोषणा झाल्यानंतर महापालिकेनेही दोन दिवसांपासून मोठ्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली होती. कर व वसुली थकबाकीची चांगली संधी प्राप्त झालेली वाया जाण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने शासनाशी तातडीने पत्रव्यवहार करण्यात आला.

हिरवा झेंडा मिळाल्यानंतर तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिल्या आहेत. या निमित्ताने पालिकेच्या महसुलात वाढ तर होईलच. शिवाय थकबाकीदारांचा बोजाही उतरेल. हातोहात पाचशे व हजाराच्या नोटा खपणार असल्याने हा योग साधण्यासाठी पालिकेच्या वसुली केंद्रांवर गर्दी होणार आहे.

मालमत्ता व पाणीपट्टीची देयके ग्राहकांच्या हाती पडली आहेत. पण मोठ्या रकमेच्या नोटा बंद झाल्याने ऑनलाइन कर भरण्याशिवाय पर्याय नाही.

महापालिकेतर्फे बुधवारी नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याचा फलक लावल्यानंतर अनेक करदात्यांना परतावे लागले होते. महापालिकेच्या रकमेचा भरणा थेट बॅंकेत जमा होत असल्याने पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यास हरकत नसल्याचे पत्र प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारी (ता. ११) रात्री बारापर्यंत कर वसुलीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत कुठलीही अट न ठेवता कर भरता येईल, असे आयुक्त कृष्णा यांनी स्पष्ट केले.

काउंटर वाढविणार
पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय झाल्याने त्या प्रमाणात गर्दीदेखील होणार असल्याने पालिकेने सहाही विभागांत कर भरण्यासाठी काउंटर उपलब्ध करून दिले आहे. कर्मचारी वाढविले जाणार असून, स्वतः अधिकारी व आयुक्त काउंटरला भेटी देणार आहेत. या निमित्ताने महापालिकेची जुनी थकबाकीसुद्धा वसूल होणार असल्याने महसुलात भर पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे महापालिकेच्या तिजोरीत ५ हजार ३२६ कोटी; मिळकतकरातून २,९८५ कोटी, तर बांधकाम करातून २,३४१ कोटी

सायली-प्रियामध्ये जोरदार जुंपली; एकमेकांच्या झिंज्या उपटणार सुभेदारांच्या सुना, कारण ऐकून अर्जुनही हैराण, प्रेक्षक म्हणतात-

Patur Hailstorm : पातूर तालुक्यात गारपीट; नुकसानीचे पंचनामे करा - आमदार नितीन देशमुख यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

अशोक खरातच्या मुलाला SITने घेतलं ताब्यात, पत्नी फरार; गेट बंद असल्यानं कंपाऊंडवरून पथक घुसले घरात

Malegaon News : विलंबाचा फटका प्रशासनाला; बारामतीत शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

SCROLL FOR NEXT