Police officers and teams present with suspects in custody in case of property transaction. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Fraud Crime : थेट बनावट कागदपत्रांद्वारे मालमत्तांची खरेदी विक्री; ‘एलसीबी’तर्फे 5 जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Dhule Fraud Crime : चितोडगड (राजस्थान) येथील वृद्धेच्या धुळ्यातील दोन प्लॉट पाच जणांनी संगनमन करीत परस्पर खरेदी-विक्री केले. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्तेची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.

या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली.(Purchase and sale of property through fraud documents dhule fraud crime news)

जेबुनिशा मोहम्मद शफी (वय ७०, रा. घर क्रमांक २७, नवे मार्केट, मानव मंदिरामागे, रावतभाटा, चितोडगड, राजस्थान) यांनी देवपूर भागात स.नं. ७४/१ ब १ क मधील प्लॉट क्रमांक ३२ क्षेत्र १०३ चौमी, तसेच स.नं. ७४/१ ब-१ क मधील प्लॉट क्रमांक १२ क्षेत्र ७५.६० चौमी, असे दोन प्लॉट १९८७-१९८८ मध्ये नोंदणीकृत खरेदीखताद्वारे खरेदी केले होते.

हे प्लॉट त्यांच्या नावावर असताना २८ ऑक्टोबर २०२० ते २८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान अमोल अशोक मोरे व इरफान रऊफ पटेल या दोघांनी या महिलेचे बनावट आधारकार्ड तयार केले.

कागदपत्रे बनावट असल्याचे माहिती असतानाही शेख अजीज शेख भिकारी (रा. गल्ली क्रमांक ७, मोहम्मदी, देवपूर), बिलकिसबी सरफुद्दीन शेख (रा. अंबिकानगर, देवपूर), रईस शेख शरीफ शेख (रा. गौसिया मशीद, गल्ली क्रमांक १, देवपूर), रामचंद्र वामन अहिरे (रा. गल्ली क्रमांक १४, वरखेडी रोड, सुभाषनगर, जुने धुळे) व सुशील प्रेमचंद जैन (रा. अंचाळे, ता. धुळे) यांनी संगनमताने जेबुनिशा मोहम्मद शफी यांच्या नावाने तोतया महिला उभी करून सहाय्यक दुय्यम निबंधक (वर्ग २), धुळे येथे उपरोक्त दोन्ही प्लॉटची परस्पर खरेदी-विक्री केली.

याबाबत जेबुनिशा यांचा मुलगा मोहम्मद शरीफ मोहम्मद शफी (रा. चितोडगड) यांनी धुळे शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा समांतर तपास करीत ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुख्य संशयित अमोल अशोक मोरे व इरफान रऊफ पटेल यांना अटक केली.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, प्रकाश पाटील, श्याम निकम, संदीप पाटील, रवींद्र माळी, सुरेश भालेराव, रविकिरण राठोड, सुशील शेंडे, नीलेश पोतदार, हर्शल चौधरी, गुणवंतराव पाटील यांनी ही कारवाई केली.

''बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने भूखंड लाटणाऱ्या टोळ्या जिल्हाभरात कार्यरत आहेत. कोणाची फसवणूक झालेली असल्यास अगर कोणाची तक्रार असल्यास तक्रारदारांनी निर्भीडपणे पुढे यावे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याशी संपर्क साधावा. पोलिस तत्काळ कारवाई करतील.''-श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक, धुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT