rahul gandhi 
उत्तर महाराष्ट्र

महाराष्ट्र, यूपी, हरियाणा आणि बिहार.. नंदुरबारच्या सभेची तुफान गर्दी पाहून राहुल गांधींनी केली भविष्यवाणी

Congress Rahul Gandhi News: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ सोशल मीडिया हँडल 'एक्स'वर शेअर केला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ सोशल मीडिया हँडल 'एक्स'वर शेअर केला आहे. राहुल गांधी यांनी व्हिडिओ शेअर करत भविष्यवाणी केली आहे. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असं ते म्हणाले आहेत. राहुल यांनी उत्तर महाराष्ट्राच्या नंदुरबारमधील काँग्रेसच्या एका सभेचा व्हिडिओ शेअर केला आहे. (Nandurbar Congress rally)

खरं म्हणजे राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्या आणि भगिनी प्रियांका गांधी-वाड्रा यांनी शेअर केलेला व्हिडिओ रिट्विट केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये राहुल गांधी म्हणालेत की, 'महाराष्ट्र असो की उत्तर प्रदेश, हरियाणा असो की बिहार सगळीकडे इंडिया आघाडीचे तुफान आहे. मी पुन्हा सांगतो. ४ जूननंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत.'

प्रियांका गांधी यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'महाराष्ट्राच्या नंदुरबारमधील लोकांच्या अशा जोशपूर्ण स्वागताचे मी हृदयापासून आभार मानते. महाराष्ट्राच्या जनतेचा संदेश स्पष्ट आहे. राज्यामध्ये इंडिया आघाडीचे सरकार बनणार आहे.' प्रियांका गांधी या नंदुरबारमध्ये काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या.

प्रियांका गांधी यांची राज्यातील ही दुसरी सभा होती. याआधी त्यांनी लातूरमध्ये सभा घेतली आहे. नंदुरबारमधील सभेत गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना सल्ला देताना म्हटलं की, 'मोदींनी माझ्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून काही शिकायला हवं. त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते.'

देशात निवडणुकीचा पारा एकदम उच्च पातळीवर पोहोचलेला आहे. देशात आतापर्यंत तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे आज प्रचाराच्या तोफा थंडावतील. देशात एकूण ७ टप्प्यामध्ये मतदान होत आहे. ४ जून रोजी निकाल लागेल. देशाच्या जनतेने कोणाच्या बाजूने कौल दिलाय हे या दिवशी स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Putin India Visit: आजचा भारत ७७ वर्षांपूर्वीचा नाही, मोदी-पुतिन भेटीत उघडकीस आले राजकारण अन् तेल करारांचे रहस्य; बाह्य दबाव फेल!

Ahmednagar–Shirdi Highway: 'कोल्हारमध्ये साईड गटाराचा स्लॅब ढासळला'; अहिल्यानगर-शिर्डी महामार्गावरील चार दिवसांपूर्वीच काम..

High Court Live Verdict : "विवाहाचं कायदेशीर वय पूर्ण झालं नाही तरीही...."; 'लीव्ह इन' बाबत उच्च न्यायालयाचा धक्कादायक निर्णय!

Marathi Breaking News LIVE: नाशिक -पुणे महामार्गावर गेल्या एक तासापासून प्रचंड वाहतूक कोंडी

तेजश्री प्रधानचा गौरव! महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठीत सांस्कृतिक पुरस्कार जाहीर, म्हणाली...'प्रत्येक दिवस काहीतरी नवीन...'

SCROLL FOR NEXT