mukmorcha
mukmorcha 
उत्तर महाराष्ट्र

शिंपी समाजबांधवांचा मूकमोर्चा

सकाळवृत्तसेवा

चाळीसगाव : येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी प्रणाली जाधव हिने केलेल्या आत्महत्याप्रकरणी "सीआयडी' चौकशी व्हावी या मागणीसाठी आज तहसील कार्यालयावर निषेध मुक मोर्चा काढण्यात आला. 

शहरातील सिग्नल पॉईंटपासून मोर्चाला सुरवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी महिलांनी निषेधाचे बॅनर घेतलेले होते. सिग्नल पाईंटपासून स्टेशन रोडने तहसील कार्यालयावर मुक मोर्चा आला असता, नायब तहसीलदार नानासाहेब आगळे व पोलिस उप निरीक्षक पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा, की उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील शिंपी समाजाच्या अल्पवयीन विद्यार्थिनी प्रणाली जाधव या बालिकेवर झालेल्या अत्याचारामुळे तिने आत्महत्या करून स्वतःची जीवन यात्रा संपवली.

संजय घुमरे या नराधमाने अजाण प्रणालीवर अमानवी अत्याचार केला व तिला पुन्हा जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकाराला घाबरून तिने आत्महत्या केली. या घटनेतील संबंधित नराधमाला अटक झाली असली तरी त्याच्यावर कठोर कारवाई करावी व पिडीत प्रणालीच्या हवालदिल झालेल्या कुटुंबीयांना न्याय व धीर द्यावा. या अमानवी घटनेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत असे निवेदनात म्हटले आहे. मोर्चात शहरासह तालुक्‍यातील शिंपी समाजाचे स्री- पुरुष, युवक- युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT