Decorations at Shri Ram Temple on Agra Road on the occasion of Shri Ram Navami.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Ram Navami 2023 : श्रीराम नवमीचे आज विविध कार्यक्रम; महिलांसाठी बाइक रॅली!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : श्रीराम नवमीनिमित्त (Ram Navami 2023) शहरातील आग्रा रोडवरील प्राचीन श्रीराम मंदिरात रंगरंगोटी करण्यात आली.

मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त गुरुवारी (ता. ३०) विविध धार्मिक अनुष्ठाने होणार आहेत. (ram navami 2023 ancient Shri Ram Temple on Agra Road was painted dhule news)

श्रीराम नवमीनिमित्त शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम होत आहेत. ठिकठिकाणच्या राममंदिरांची रंगरंगोटी करत गुरुवारी विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे. शहरातील आग्रा रोडवर सुमारे दोनशे वर्षांपूर्वी श्रीराम मंदिर उभारण्यात आले आहे.

रंगरंगोटीमुळे मंदिराला नवीन झळाळी प्राप्त झाली आहे. भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल आणि भाजपच्या बेटी बचाव, बेटी पढावच्या जिल्हाध्यक्षा अल्पा अग्रवाल या दांपत्याकडून शहरात गुरुवारी महिलांसाठी बाइक रॅली काढली जात आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

पारंपरिक आणि सांस्कृतिक वेशभूषेत सहभागी महिलांना बक्षिसे आणि प्रशस्तिपत्र दिले जाईल. ही बाइक रॅली सकाळी नऊला श्री संतोषीमाता मंदिर चौकातून सुरू होईल. विविध मार्गे महापालिकेच्या जुनी इमारतीजवळ समारोप होईल.

कुसुंब्यात कार्यक्रम

कुसुंबा (ता. धुळे) येथे श्रीराम मंदिर न्यास संस्थानतर्फे गुरुवारी सकाळी नऊला श्रीराम जन्मोत्सव साजरा होईल. भूषण महाराज आंबा-पिंप्रीकर यांचे कीर्तन होईल. भाविकांना महाप्रसादाचे वाटप होईल. उपस्थितीचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! सोमवारी मध्यरात्रीपासून भाववाढीचा निर्णय, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Kalamboli Accident: नवी मुंबईत भरधाव कारचा थरार! डॉक्टरनं पदपथावरील पादचाऱ्यांना चिरडलं; लहान मुलांसह ४ जण गंभीर जखमी

Rahul Gandhi Defamation Case: पुण्यात राहुल गांधी मानहानी खटल्याला कडक कायदेशीर वळण! विशेष कोर्टातील उलटतपासात सात्यकी सावरकरांनी मान्य केला '१० दया याचिकां'चा ऐतिहासिक ताळेबंद

Kannad Accident : मद्यधुंद क्रूझर चालकाने बुलेटला चिरडले; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

Pune Developer Death: बांधकाम व्यावसायिक कपिल गांधी यांचे हृदयविकाराने निधन

SCROLL FOR NEXT