murder imege
murder imege 
उत्तर महाराष्ट्र

चारा आणण्यासाठी दोघी गेल्या अन..झाला खून 

सकाळ वृत्तसेवा


रावेर : केऱ्हाळे खुर्द (ता. रावेर) गावाच्या उत्तरेकडील खेडी शेती शिवारात गुरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या दोन महिलांचा तीक्ष्ण हत्याराने निर्घृणपणे खून झाल्याची घटना दुपारी उघडकीस आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांसह अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. 

केऱ्हाळे खुर्द (ता. रावेर) गावाच्या सुमारे तीन किलोमीटर अंतरावर उत्तरेस सातपुड्याच्या पायथ्याशी खेडी शेती शिवारात दोघा महिलांचे मृतदेह वेगवेगळ्या शेतात आढळून आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केऱ्हाळे खुर्द (ता. रावेर) येथील शालूबाई गौतम तायडे (वय 57), नसीमा रुबाब तडवी (वय 46) या काल (ता. 18) रोजी सकाळी दहाच्या सुमारास गुरांना चारा आणण्यासाठी खेडी शेतीशिवारात गेल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत या महिला घरी न आल्याने आज सकाळी त्यांच्या नातेवाइकांनी रावेर पोलिस ठाणे गाठत हरविल्याची नोंद केली. दरम्यान, शेती शिवारात मजूर कामावर जात असताना त्यांना महिलांचे मृतदेह आढळले. ही माहिती नातेवाइकांना कळल्यावर ते पाहणीसाठी गेले असता त्यांची ओळख पटली. यात विठ्ठल नारायण सोनवणे यांच्या तूर लावलेल्या शेतात शालूबाई तायडे यांचा, तर नारायण पाटील यांच्या कपाशीच्या शेतात नसीमा तडवी यांचा मृतदेह आढळून आला. दोघांच्या अंगावर, गळ्यावर, पोटावर आणि छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले आहेत. घटनेची माहिती कळताच केऱ्हाळे बुद्रूक येथील सरपंच राहुल पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुनील कदम, पोलिसपाटील, पोलिस कर्मचारी व परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. 

गरिबीची परिस्थिती 
दोन्ही महिलांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. शेतमजुरी व गुरे ढोरे यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. शालूबाई तायडे यांच्या पश्‍चात पती, तीन मुले, एक मुलगी तर नसीमा तडवी यांच्या पश्‍चात पती व दोन मुले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला हे समजू शकले नाही. या घटनेने तालुकाभरात खळबळ उडाली आहे. 

पोलिस अधीक्षकांची भेट 
सायंकाळी पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी श्वान पथक, ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वानाने कोणताही मार्ग दाखवला नाही. 

जळगावला शवविच्छेदन 
दोन्ही मृत महिलांचे शवविच्छेदन जळगावच्या सामान्य रुग्णालयात करण्याचा निर्णय पोलिस अधिकाऱ्यांनी घेतला. रात्री उशिरा मृतदेह जळगावकडे रवाना करण्यात आले. या बाबत संजय गौतम तायडे यांनी रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे तपास करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT