Idols of Adishakti in various shapes and forms are listed for sale in the market esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Navratri Festival: जिल्हावासीयांना आदिशक्तीच्या आगमनाचे वेध; विविध रूपांतील मूर्ती अन इतर साहित्य विक्रीस

सकाळ वृत्तसेवा

Dhule Navratri Festival : लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर आता धुळे शहर, जिल्हावासीयांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. या नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. बाजारात श्री आदिशक्तीच्या विविध रूपांतील सुंदर मूर्ती दाखल झाल्या आहेत.

नक्षीदार गरबा घट, दुर्गा देवीच्या आकर्षक मूर्ती, विविध आकारांतील टोपल्यांची दुकाने यामुळे बाजार फुलला आहे.(residents of district are waiting for arrival of Adishakti dhule navratri festival)

नवरात्रोत्सवात सप्तशृंगी देवी, रेणुकामाता रूपातील मूर्तींना सर्वाधिक मागणी असते. श्री शक्तिदेवीच्या मूर्ती बनविण्यासाठी लाल, हिरवा, गुलाबी, पांढरा, भगवा आदी रंगांचा प्रामुख्याने उपयोग दिसून येत आहे. मूर्तींना विविध प्रकारच्या आभूषणांसह विविध रंगांच्या आकर्षक साडी कारागिरांकडून तयार केल्या गेल्या आहेत.

साडी नेसलेल्या देवीच्या मूर्तींना ग्राहकांची पसंती आहे. एक फूट उंचीपासून ते साडेसात फुटांच्या मूर्ती विक्रीस आल्या आहेत. ११०० ते २१ हजार रुपयांपर्यंत मूर्तींचे दर आहेत. अंबामाता, रेणुकामाता, कालिकामाता, सप्तशृंगीदेवी या मूर्तींचा यात समावेश आहे.

साहित्य, कपड्यांची खरेदी

नवरात्रोत्सवात लागणारे विविध साहित्यही बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू आहे. घटस्थापनेसाठी आवश्यक असणारी मडकी, घट, मुकुट, फेटे, दागिने, मंदिर, तोरण, झालर, परडी, नाडा, आकर्षक झुंबर असे विविध साहित्य खरेदी होत आहे.

अलीकडच्या काळात नऊ दिवसांसाठी निरनिराळ्या रंगांचे पेहराव तरुणाई करते. बाजारात एम्ब्रॉयडरी केलेल्या चनिया-चोली, विविध प्रकारचे घागरा चोली, मेटलचे दागिने, मुलांसाठी ड्रेसेस अनेक प्रकारात उपलब्ध आहेत. देवीच्या घटासाठी विधिवत पूजेसाठी लागणारे खण-साडी, बांगडीओटी तसेच घटाच्या पूजेसाठी पत्रावळीही बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत, तसेच कौट, कवंडा, सीताफळ, बेलफूल, पेरू या पाच फळांचाही समावेश आहे.

दरम्यान, मूर्तीच्या किमतींमध्ये यंदा १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. गणेशोत्सवात सरकारने पीओपीबाबत आपले धोरण उशिरा स्पष्ट केल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अनेक मूर्तींची मागणी वाढली आणि विक्री मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.

मूर्तींच्या किमतीत वाढ

यंदा शक्तिदेवी मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात वाढ झाली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस तसेच रंगाच्या किमतीतसुद्धा भरमसाठ वाढ झाली आहे. परिणामी, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे दर गगनाला भिडले आहेत. एक फुटाच्या मूर्तीचे दर पाचशे ते एक हजार रुपये आकारण्यात येत आहेत. मूर्तीच्या किमतीत साधारण १० टक्के वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT