nashik.jpg
nashik.jpg 
उत्तर महाराष्ट्र

विद्यार्थ्याच्या आत्महत्येस जबाबदार प्राध्यापिका निलंबित

सकाळवृत्तसेवा

सिडको( नाशिक) : उत्तमनगर येथील कर्मवीर वावरे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (वय19) या विद्यार्थ्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या प्राध्यापिकेला निलंबित करून कारवाई करावी या मागणीसाठी आज महाविद्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. संस्थेच्या संचालकांसह शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित प्राध्यापिकेचे निलंबन करण्यात येत असल्याचे जाहीर केले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कर्मवीर वावरे महाविद्यालयात एस. वाय. बी. कॉम. चे शिक्षण घेणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे या विद्यार्थ्याने शनिवारी(ता.8) गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकारानंतर विक्रांत याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली. त्यात ''महाविद्यालयातील प्रा. पाटील यांनी नापास केले असून पेपर दाखविण्यास तयार नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे'' नमूद केले आहे. त्यामुळे ''संबंधित प्राध्यापिकेवर गुन्हा दाखल करून तिला महाविद्यालयातून निलंबित करावे.'' ,अशी मागणी आजच्या आंदोलनात करण्यात आली.

सकाळी विक्रांत याचे नातेवाईक, मित्र तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी एकत्र येवून विक्रांत याच्‍या घरापासून महाविद्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी विद्यार्थ्यांनी ''विक्रांतला न्याय द्यावा, पाटील यांना निलंबित करावे'' ,अशी मागणी करणारे फलक हातात घेवून महाविद्यालयात दाखल झाले. गर्दीचा विचार करता अंबड पोलिसांनी महाविद्यालयात केवळ नातेवाईकांचाच प्रवेश दिला. त्यानंतर संस्थेचे संचालक नानासाहेब महाले यांनी याबाबत चर्चा करून संबंधित प्राध्यापिकेवर कारवाई करण्यासाठी एक समिती नेमण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, नातेवाईक व आंदेालनकर्त्यांचा यास तीव्र विरोध असल्याने ''निलंबन करा मगच आंदोलन थांबवू'' असे सांगून महाविद्यालयाच्या आवारात व रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु  केले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून याठिकाणी संस्थेचे शिक्षणाधिकारी संजय शिंदे, काजळे यांना बोलविण्यात आले. शिक्षणाधिकारी, संचालक महाले, त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी दत्ता पाटील, यांनी विचार करून याबाबत मविप्रच्या सरचिटणीस निलीमा पवार यांच्याशी चर्चा केली. या प्रकाराचे गांभीर्य विचारात घेवून संबंधित प्रा. एस. एस. पाटील यांना निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सदरचे पत्र तयार करून त्या पत्राची एक प्रत विक्रांत याच्या आईला देण्यात आली. यानंतर उपस्थितांनी विक्रांत यास श्रद्धांजली अर्पण केली. 

यावेळी नगरसेवक मुकेश शहाणे, बाळा दराडे, संतोष सोनपसारे, संजय भामरे, भुषण राणे, बाळासाहेब गिते, योगेश बेलदार , सागर नागरे, गणेश सांबरे आकाश पवार, नितीन अकोलकर, रोहित परदेशी, सागर पवार, सुजित पाटील, निलेश आहिरे, सायली शिंपी, वैशाली काळे, हर्षदा पाटील यांचेसह महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT