MLA jaykumar raval esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 'प्रकाशा- बुराई'ला महिन्यात सुधारित प्रशासकीय मान्यता

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शिंदखेडा आणि नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरणारी ‘प्रकाशा- बुराई’ उपसा सिंचन योजनेला महिन्याआत सुधारित प्रशासकीय मान्यता देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयकुमार रावल यांना हिवाळी अधिवेशनात दिली.

त्यानुसार २०२२- २०२३ च्या दरसूचीवर आधारित ८५० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया सुरू झाली असून त्यानंतर उर्वरित कामांसाठी निविदा निघू शकेल, असे आमदार रावल यांनी सांगितले.(Revised administrative approval in month of Prakash Burai dhule news)

शिंदखेडा व नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ‘प्रकाशा- बुराई’ उपसा सिंचन योजना वरदान ठरणारी आहे. तिला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी आमदार रावल यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्ष्यवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला.

या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून द्यावी आणि योजनेचे काम सुरू करून विक्रमी वेळेत हा प्रकल्प पूर्ण करावा, दुष्काळग्रस्त भागाला दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार रावल यांनी चर्चेवेळी केली.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री फडणवीस म्हणाले, की योजनेला १९९९ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. त्या वेळी ११० कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु, ही योजना अनेक वर्षे बंद राहिली. अखेर २०१३ नंतर या योजनेचे काम सुरू झाले. यातील चार पंपगृहापैकी एक पंपगृहाचे काम पूर्ण, तर एका पंपागृहाचे काम अपूर्ण, उर्वरित दोन पंपगृहाचे काम सुरू झालेले नाही. तसेच जलवाहिनीचे कामही अपूर्ण आहे.

विविध प्रश्‍न निकाली

या योजनेमुळे अवर्षणप्रवण २८ गावांना सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची सोय होणार असून ७ हजार ८५ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. अवर्षणग्रस्त असलेला हा भाग बागायत होण्यास मदत होणार आहे. यात २०१९ मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी ५७० कोटींचा प्रस्ताव सादर झाला. परंतु, त्यावेळी ही मान्यता मिळू शकली नाही.

नंतर महायुतीचे शासन आल्यानंतर या प्रस्तावावर काम सुरू झाले. परंतु, एमडब्ल्यूआरआयने हरकत घेत पाणी उपलब्धता प्रमाणपत्र नसल्याचे नमूद केले. तो प्रश्नही आता निकाली काढत योजना पूर्णत्वासाठी मार्ग काढला आहे, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

रावल यांची भूमिका

आमदार रावल म्हणाले, की शिंदखेडा मतदारसंघ हा कायमस्वरूपी दुष्काळी आहे. त्याच्या दुष्काळमुक्तीचे स्वप्न मी पाहिले आहे. त्यानुसार तापी नदीवरील सुलवाडे, सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजेसचे काम पूर्ण करणे, अमरावती व वाडी शेवाडी प्रकल्प, बुराई बारमाही योजना पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न केले. नंतर सुलवाडे- जामफळ योजना व प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजनेवर लक्ष केंद्रित केले.

सुलवाडे- जामफळ योजनेचे तब्बल ४८०० कोटींच्या निधीतून गतीने काम सुरू आहे. दुष्काळमुक्तीच्या स्वप्नात एकमेव अडथळा ठरणारी ‘प्रकाशा- बुराई’ उपसा सिंचन योजनेचे काम चार ते पाच वर्षांपासून बंद आहे. त्यास सुधारित प्रशासकीय मान्यतेची गरज होती. ती श्री. फडणवीस यांच्या आश्वासनामुळे पूर्ण झाली आहे. त्यामुळे शिंदखेडा तालुका दुष्काळमुक्तीचे स्वप्न साकार होणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रावल यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: विजय आपलाच, पण त्याच्यापासून सावध राहा..., हरभजन सिंगचा भारतीय संघाला इशारा

Railway News: सामान्य डब्यांनाही एसीसारखी स्वच्छता असणार! भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; ट्रेन प्रवासात ऐतिहासिक बदलाची नांदी

Mumbai News: अतिक्रमण काढण्यास महापालिका अपयशी, उच्च न्यायालयाचे ताशेरे; महापालिका आयुक्तांना आदेश

14,50,00,000 रुपये ! अभिषेक बच्चनची लक्झरी अपार्टमेंट विकून बक्कळ कमाई ; सिनेमे अपयशी पण बिझनेसमध्ये यश

Latest Marathi News Live Update : गोंदियात बाळाची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT