Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : साडेसातशे हरकतदारांची सुनावणीला ‘दांडी’

सकाळ वृत्तसेवा

धुळे : हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्तांच्या सुधारित कर आकारणीच्या (Revised taxation of property in boundary area) हरकतींवर २७ जूनपासून प्रारंभ झाला. १ जुलैपर्यंत अर्थात गेल्या पाच दिवसात अडीच हजारपैकी दीड हजारावर हरकतींवर सुनावणी झाली. मात्र, सुमारे साडेसातशे हरकतदार प्रत्यक्ष सुनावणीला दांडी (Bunked) मारल्याचे चित्र पाहायला मिळाले. मंगळवारी (ता. ५) सुनावणीची शेवटचा दिवस असून, यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. संबंधित पूर्वाश्रमीच्या दहा गावांपैकी बाळापूर येथून सर्वाधिक ७२४ हरकती आल्या, आत्तापर्यंत सुनावणीला दांडी मारणाऱ्यांची संख्याही बाळापूरमधूनच आहे हे विशेष. (Revised taxation of property in boundary area Hearing bunked by 750 objectors Dhule News)

महापालिकेने हद्दवाढीसह संपूर्ण महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे जीआयएस मॅपिंग सर्वेक्षण केल्यानंतर मालमत्तांना करयोग्य मूल्य निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यात मोराणे, महिंदळे, अवधान, पिंप्री, बाळापूर, भोकर, नगाव, चितोड, वरखेडी, नकाणे या पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मालमत्तांची सुधारित करमुल्यांकनाच्या याद्या प्रसिद्ध करून हरकती मागविण्यात आल्या होत्या. मुदतीअंती एकूण ३४५८ हरकती दाखल झाल्या. या हरकतींवर २७ जूनपासून महापालिकेत सुनावणी सुरू आहे. शनिवार (ता.२) व रविवार (ता.३) वगळता गेल्या सहा दिवसात एकूण २५०४ हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली. यात मात्र १७६० हरकतदार प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहिले. तब्बल ७४४ हरकतदार मात्र सुनावणीला गैरहजर राहिले आहेत. जे हरकतदार सुनावणीला गैरहजर राहिले त्यांच्या सुनावणीवर पुढे कोणतीही प्रक्रिया होणार नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे, त्यामुळे या हरकती केवळ संख्या वाढविणाऱ्या ठरल्या आहेत.

सर्वाधिक बाळापूरमधून
संबंधित दहा गावांपैकी सर्वाधिक ७२४ हरकती बाळापूर येथून दाखल झाल्या आहेत. यातील आत्तापर्यंत ४८० हरकतींवर सुनावणी झाली. यात ३३९ हरकतदार सुनावणीला हजर होते तर तब्बल १४१ हरकतदारांनी सुनावणीला दांडी मारली आहे. अर्थात संबंधित पूर्वाश्रमीच्या सर्व दहा गावांतून हरकतदार सुनावणीला गैरहजर राहात असल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता. ५) सुनावणीचा शेवटचा दिवस आहे.

एक जुलैपर्यंतची स्थिती अशी
-एकूण हरकती.....३४५८
-सुनावणी पूर्ण......२५०४
-हजर...............१७६०
-गैरहजर..............७४४
-स्थळ पाहणी........२३६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT