crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : खुनीहल्ल्यातील चौघांना सश्रम कारावास; ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद

दिवाणमळा (ता. धुळे) गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपीला दोषी ठरवून जिल्हा सत्र न्यायाधीश (चतुर्थ) श्रीमती राजश्री आर. पुलाटे यांनी दोन वर्षे, तर तिघांना सहा महिने सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : दिवाणमळा (ता. धुळे) गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपीला दोषी ठरवून जिल्हा सत्र न्यायाधीश (चतुर्थ) श्रीमती राजश्री आर. पुलाटे यांनी दोन वर्षे, तर तिघांना सहा महिने सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली. (Rigorous imprisonment for four in murderous attack dhule crime news)

दिवाणमळा (ता. धुळे) येथे ९ मार्च २०१५ ला ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून झालेल्या हाणामारीत गोपाल महादू गवळी (रा. दिवाणमळा) यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती.

या प्रकरणी गोपाल गवळी यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून धीरज ठगाजी गवळी, सचिन गवळी, राकेश भगवान गवळी, अशोक मुखाजी गवळी (रा. दिवाणमळा) यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता.

या घटनेचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक गवई यांनी करून चौघा संशयितांविरुद्ध आवश्यक पुरावे गोळा करून धुळे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायाधीश (चतुर्थ) राजश्री आर. पुलाटे यांच्यासमोर चालले. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. नीलेश कलाल यांनी कामकाज पाहिले. सरकार पक्षाकडून साक्षीदार व पंच तसेच तपास अधिकारी गवई यांची साक्ष न्यायालयासमोर नोंदविण्यात आली.

तसेच सरकारी वकील अ‍ॅड. कलाल यांनी न्यायालयात संशयितांविरुद्ध जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयासमोर आलेले साक्षी-पुरावे व सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती पुलाटे यांनी ८ जानेवारीला आरोपी धीरज ठगाजी गवळी यास दोन वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

तसेच सचिन ठगाजी गवळी, राकेश भगवान गवळी व अशोक मुखाजी गवळी या तिघांना सहा महिने सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राकेश साळुंखे यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले, अशी माहिती मोहाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT