Additional Superintendent Kishore Kale, DySP Sachin Hire, Inspector Agarkar and officers participated in the route march.
Additional Superintendent Kishore Kale, DySP Sachin Hire, Inspector Agarkar and officers participated in the route march. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : पेट्रोलचोरीच्या वादातून दोन गटांत दंगल; पोलिसांचे पथसंचलन

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : पेट्रोल चोरल्याच्या वादातून दोन गटांत तुफान दगडफेक होऊन दंगल उसळल्याची घटना रविवारी (ता. १४) रात्री साडेदहाला शहरातील कुंभारटेक व मदिना मोहल्ला परिसरात घडली.

दगडफेकीत दोन जण जखमी झाले.

दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुमारे २६ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमवारी (ता. १५) पोलिसांनी शहरातून पथसंचलन केले.

रवींद्र बाबूलाल बडगुजर (वय ४९, रा. कुंभारटेक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या दुचाकीमधून पेट्रोल कोणी चोरले याबाबत विचारपूस केल्याचा राग आल्याने संशयितांनी मारहाण सुरू केली. त्यामुळे ते घराकडे परत जाऊ लागले.

संशयितांनी दगडविटांचा मारा केला. या घटनेत डोक्याला दगड लागून विष्णू महादू वाणी जखमी झाले. संशयित तौफिक शेख, आकिब शेख, बाबा मन्सुरी, अबुझार शेख, दानिश बागवान, नदीम शेख, मुस्तकिम शेख, शाहिद शेख, सईद पिंजारी, सादिक पिंजारी, सलमान पिंजारी.

सादिक शेख, अजहर शेख, अकिब जावेद, नविद शेख, ऐहतेशाम शेख, इमरान शेख, साहिल शेख व अन्य १५ ते २० संशयित (सर्व रा. मदिना मोहल्ला) यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याच प्रकरणात शहनाज खलील शेख (३५, रा. मदिना मोहल्ला) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, पेट्रोलचोरीबाबत संशयितांनी मारहाण व दगडफेक केल्याने तिचा दीर नदीम शेख जखमी झाला.

संशयित रवींद्र बडगुजर, विनोद कुंभार, विजू कुंभार, अतुल माळी, अक्षय चौधरी, कमलेश चौधरी, बंटी महाजन, गोपाल माळी व अन्य पाच ते दहा जण (सर्व रा. माळी गल्ली, शिरपूर) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांचे पथसंचलन

दरम्यान, संक्रांतीच्या पूर्वसंध्येला दंगल झाल्याने पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला. सोमवारी सायंकाळी दंगलग्रस्त भागासह परिसरातून अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, निरीक्षक अन्साराम आगरकर.

सांगवीचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलन करण्यात आले. संशयितांची धरपकड सुरू असून, परिस्थिती नियंत्रणात आहे, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT