twin vasre.jpg 
उत्तर महाराष्ट्र

जुळ्या वासरांना पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी    

दीपक खैरनार : सकाळ वृत्तसेवा

अंबासन : एका जर्सी गाईला जुळी वासरे झाली आहेत. अशा प्रकारची घटना ही दुर्मीळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही तपासणी केली असता दोन्ही वासरे ठणठणीत असल्याचे सांगितले. परिसरात गायीला जुळी झाल्याचे कळताच बघ्यांनी गर्दी केली आहे.

नागरिकांसाठी कुतुहलाचा विषय

जोडव्यवसाय म्हणून येथील हेमंत रमेश ततार या कृतिशील शेतक-याने गोपालन करीत दुधाचा व्यवसाय सुरू केला. निमधरा फाट्याजवळ वडिलोपार्जित शेतीजमीन हेमंत करीत आहेत. शेतातच गायी व बैलांसाठी गोठा बांधला असून शेती सांभाळून दुधाच्या व्यवसायासाठी त्यांनी दोन देशी गायींसह जर्सी गाईही विकत घेतली आहे. त्यातील एका जर्सी गाईने नुकताच एकाच वेळी दोन वासरांना जन्म दिला. ही दोन्ही वासरे वेगवेगळ्या रंगांची आहेत. याअगोदर मात्र या जर्सी गाईने दोन वेळा एकाच वासरांना जन्म दिला आहे.

दोंन्ही वासरे व गाय सुदृढ व सुखरुप

एकाच वेळी दोन वासरे जन्माला येणे ही लाखातील एखादी घटना असल्याचे नामपुर येथील पशु वैद्यकीय अधिकारी कपिल खंडाळे यांनी सांगितले. दोंन्ही वासरे व गाय सुदृढ व सुखरुप आहेत. सकस आहार, योग्य निगा आणि वेळेवर औषधोपचार या त्रिसूत्रीचा वापर करून केलेले संगोपन आणि तज्ञांच्या सल्ल्याने घेतलेली गाईची गर्भावस्थेतील विशेष काळजी यामुळे ही गाय व दोनही वासरे ठणठणीत असून, ती दररोज 12 ते 14 लिटर दूध देते आहे. साधारणपणे 5 टक्के गायीमध्ये जुळे होण्याची शक्यता असते. गुणसूत्रांमधील बदल व अनुवंशिकता या घटकांचा यावर परिणाम होतो. अशा गायी या आर्थिकदृष्ट्या फायदेशीरही ठरतात, असे शेतकरी हेमंत ततार यांनी सांगितले. परिसरात जर्सी गायीला जुळी वासरे झाल्याची वार्ता वा-यासारखी पसरली होती. बघ्यांनी पहाण्यासाठी एकच गर्दी केली होती.



 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT