Saima Shaikh dream of nine lakh completed by donors 
उत्तर महाराष्ट्र

दानशूरांच्या नऊ लाखांमुळे सायमा शेखची स्वप्नपूर्ती !

अश्‍पाक खाटीक

ःधुळे- सायमाची हुशारी, चुणूक पाहून तिच्या उच्च शिक्षणाविषयी स्वप्नपूर्तीचा विश्‍वास जरी असला तरी त्यात आर्थिक स्थितीचा मोठा अडथळा होता. मात्र, माणुसकीचा झरा अजूनही आटलेला नाही याचा प्रत्यय सायमासह शेख परिवाराला आला. तिच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी असंख्य दानशूरांचे मदतीचे हात पुढे आले, त्यांनी नऊ लाखांचा निधी संकलित केला आणि त्या बळावर सायमाने स्वप्नपूर्तीसाठी जर्मनीला प्रयाण केले.

धुळे शहरासह राज्यात पुरोगामी चळवळीतील सर्वांना ओळखीचे नाव ते म्हणजे नुरा शेख. त्यांना दोन मुली आणि मुलगा आहे. सायमा ही थोरली लेक. ती लहानपणापासून हुशार, होतकरू. सायमाची अभ्यासातील आवड पाहता तिला शिकू द्यावे, असा निर्णय शेख परिवाराने घेतला. 

परदेशात शिक्षणाची मनीषा 
तिचे प्राथमिक शिक्षण येथील एल. एम. सरदार उर्दू हायस्कूलमध्ये झाले. ती दहावीत उर्दू माध्यमात जिल्ह्यात पहिली आली. तिची शिक्षणातील प्रगती पाहून आर्थिक बिकट स्थितीशी मुकाबला करत, मुस्लिम समाजातील पारंपरिक विचारांना फाटा देत नुरा शेख यांनी पुणेस्थित आझम कॅम्पसमध्ये सायमाचा प्रवेश घेतला. तेथे तिने बारावीत चांगले गुण मिळविले. याच महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयात तिने पदवी घेतली. पुढील शिक्षण परदेशात घेण्याचा मनोदय सायमाने वडिलांकडे बोलून दाखविला. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नुरा शेख यांनी तयारी सुरू केली. त्यासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य वसंत शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

जर्मनीतील बौर्न विद्यापीठात "फिजिक्‍स अस्ट्रोनामी'च्या प्रवेशासाठी प्रबंध सादर केला. तो विद्यापीठाने मंजूर केला. त्यामुळे सायमाचा जर्मनीतील विद्यापीठाचा प्रवेश निश्‍चित झाला.

नऊ लाखांचा निधी संकलित
सायमाचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी पालकांपुढे होती. तिला दोन वर्षांसाठी नऊ लाखांचा खर्च येणार होता. गरिबीमुळे तो पेलवणारा नव्हता. मात्र, बाप-लेकीने हिंमत सोडली नाही. त्यांच्या पाठीशी अनेक दानशूर उभे राहिले. काही दिवसात नऊ लाखांचा निधी संकलित झाला. त्यातून सायमाने विद्यापीठाचे प्रवेश शुल्क भरले. या बळावर आणि दानशूरांचे आभार मानत सायमा जर्मनीकडे रवाना झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT