Live Photo
Live Photo 
उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये उद्यापासून 5 दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या भागावर परतीच्या पावसाने मेहरबानी केली आहे. धो-धो कोसळलेल्या पावसाने नुकसानीला सामोरे जावे असले, तरीही टंचाईतून काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात उद्यापासून (ता. 25) पाच दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे. 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या 24, गुरुवारी (ता. 26) 53, शुक्रवारी (ता. 27) 44, तर शनिवारी (ता. 28) 13 व रविवारी (ता. 29) 27 मिलीमीटर पावसाची शक्‍यता आहे. या कालावधीत कमाल तापमान 30 ते 33 व किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअसपर्यंत, तर वाऱ्याचा वेग तासाला 3 ते 6 किलोमीटर राहण्याची शक्‍यता या विभागाची आहे. हवामानातील बदलामुळे धुळीचे साम्राज्य वाढलेले असताना आरोग्याचे प्रश्‍न तयार झाले होते. पावसाने वातावरणाला कलाटणी मिळाल्याने या प्रश्‍नांवर काही अंशी उपाय होईल. आज सायंकाळी शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. 
आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासात मालेगावमध्ये 13, नांदगावमध्ये 5, चांदवडमध्ये 33, कळवणमध्ये 87, बागलाणमध्ये 37, सुरगाण्यात 1.2, देवळ्यात 22, निफाडमध्ये 3.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी 1 जून ते 24 सप्टेंबर या कालावधीत 86.5 टक्के पाऊस जिल्ह्यात झाला होता. यंदा आतापर्यंत 148.27 टक्के पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यातील आतापर्यंतचा पाऊस 
(आकडे पावसाच्या टक्केवारीचे) 

तालुका         पाऊस            तालुका            पाऊस 
नाशिक       187.46          कळवण           91.85 
इगतपुरी     156.54          बागलाण         151.53 
दिंडोरी        159.79           सुरगाणा        156.83 
पेठ            148.22           देवळा             78.75 
त्र्यंबकेश्‍वर   174.07          निफाड           110.79 
मालेगाव     132.49          सिन्नर           142.02 
नांदगाव      113.60          येवला            151.19 
चांदवड       120.78         (देवळ्याला आणखी पावसाची गरज) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT