north maharashtra loksabha election
north maharashtra loksabha election sakal
उत्तर महाराष्ट्र

Sakal Survey Loksabha 2024: उत्तर महाराष्ट्रात कमळ? मविआचा एकच मास्टरस्ट्रोक रोखू शकेल विजयीरथ

राहुल रनाळकर

भाजपच्या खासदारांना इथल्या मतदारांनी नेहमीच साथ दिली. तथापि, अजून सर्व ठिकाणच्या उमेदवारी जाहीर व्हायच्या आहेत. त्यामुळे उमेदवार किती तुल्यबळ आहे, यावर देखील निवडणुकीचा कल पाहायला मिळणार आहे. प्रामुख्याने शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीनंतर मतदारांचा कल कसा राहील, हे पाहणे देखील महत्त्वाचे.

नाशिक लोकसभेचा कल भाजपकडे असला तरी ही जागा शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकांमध्ये विजयश्री प्राप्त केलेले हेमंत गोडसे हेच यंदाही शिंदे शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे विजय करंजकर मैदानात असतील. भाजपने या जागेवर दावा सांगितला आहे. मात्र, पारडे शिंदे शिवसेनेचे जड दिसत आहे.

भाजप गोडसेंसाठी कशारीतीने मैदानात उतरेल, हे पाहणे महत्त्वाचे. भाजपकडे कल असला तरी विद्यमान खासदारांबद्दल पदाधिकारी, पक्ष, मित्रपक्ष यासगळ्यात नाराजीची स्थिती आहे. त्यामुळे लढत चुरशीची होईल, अशी चिन्हे आहेत. निष्ठावंत शिवसैनिक विरुद्ध फुटीर शिवसैनिक असा सामना रंगेल.

धुळ्यात भाजपमध्येच चुरस

भाजपसाठी धुळे मतदारसंघात अनुकूल वातावरण असले तरी देखील इथे उमेदवारीसाठी मोठी चुरस आहे. भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे, काँग्रेसमधून पाच वर्षांपूर्वी भाजपत आलेले तरुण नेते हर्षवर्धन दहिते, मालेगावातील अॅड. शिशिर हिरे, माजी पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर यांच्यात उमेदवारीसाठी चुरस आहे.

काँग्रेसकडून डॉ. तुषार शेवाळे यांचे नाव आघाडीवर आहे. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या संदर्भातील चर्चेने मधल्या काळात उचल खाल्ली होती. आमदार पाटील यांची भूमिका धुळ्यात निर्णायक ठरणार आहे. भाजपसाठी इथे अनुकूल वातावरण आहे. ‘एमआयएम’ची भूमिका काँग्रेसच्या संदर्भात निर्णायक असेल. यंदाच्या निवडणुकीत धुळ्यात अमरिश पटेल यांची भूमिका देखील निर्णायक ठरणारी आहे.

नंदुरबारमध्ये गावित विरुद्ध अन्य

सध्या नंदुरबारमध्ये खासदार हीना गावित आणि संपूर्ण गावित कुटुंब यांच्याविषयी नाराजीची भावना आहे. गावित कुटुंबिय याविरुद्ध अन्य सगळे नेते अशी स्थिती इथे दिसून येते. मात्र, हीना गावित यांनी दिल्लीश्वरांचे मन जिंकलेले असल्याने उमेदवारीबाबत वेगळा विचार होण्याची शक्यता कमी दिसते. स्वरुपसिंह नाईक यांच्या स्नुषा रजनी नाईक या काँग्रेसच्या उमेदवार होऊ शकतात. नंदुरबारमध्ये देखील अमरिशभाई पटेल कोणाच्या पारड्यात वजन टाकतात, यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत.

विद्यमान विरुद्ध स्थानिक पक्ष

जळगाव लोकसभेतील तरुण खासदार उन्मेष पाटील हे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीतील आहेत. जळगाव मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवार बदलूनही भाजपचा वरचष्मा राहिला होता. आता पुन्हा विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्याची चर्चा सुरु आहे.

खासदार पाटील यांना स्थानिक नेतृत्वाला खूष करणे न जमल्याने विद्यमान खासदार विरुद्ध स्थानिक पक्ष अशी स्थिती आहे. यंदा स्मिता वाघ किंवा रोहित निकम यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता दिसते. ठाकरे गट मैदानात असेल, मात्र नावावर एकमत इथे दिसून येत नाही. गुलाबराव वाघ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसेंच्या भूमिकेकडे लक्ष

रावेर लोकसभेतील समीकरणे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याभोवती फिरत आहे. आता खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकारल्यास स्वतः एकनाथ खडसे मैदानात राष्ट्रवादीकडून असतील, हे स्पष्ट आहे. भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने रक्षा ऐवजी कोण हा प्रश्न आहे. त्यावेळी माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे मैदानात असतील.

विद्यमान खासदारांसमोर आव्हानांचा डोंगर

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा खासदार शरद पवार यांचा एकेकाळचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. गेल्या निवडणुकीच्या तोंडावर भारती पवार यांचा भाजपत प्रवेश होऊन त्या खासदार झाल्या. पुढे केंद्रात राज्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. भारती पवार यांच्या एकूण कामगिरीबाबत भाजपतील दिल्लीश्वर खूष असले तरी स्थानिक पातळीवर त्यांच्याबद्दलची नाराजी निवडणूक पूर्व सर्वेक्षणातून स्पष्टपणे दिसून येते.

त्यामुळे शरद पवारांची खेळी इथे निर्णायक ठरणार आहे. आव्हान देणारा तगडा उमेदवार आणि थेट समोरासमोर लढत झाल्यास भाजपसाठी इथे मोठी अडचण होणार आहे. भारती पवार यांचे तिकीट निश्चित असल्याने समोर कोण, हे अद्याप गुलदस्तात आहे. भाजपविरुद्धच्या वातावरणात कांदाप्रश्नाची मोठी भूमिका आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT