live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

महाजनादेश यात्रेचे शहरभर अनधिकृत होर्डिंगबाजी 

सकाळ वृत्तसेवा

हौशे-नवश्‍यांसह इच्छुकांकडून वाहतूक बेटांवर अतिक्रमण; महापालिका-पोलिसांचा कानाडोळा 

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये येत्या बुधवारी (ता.18) महाजनादेश यात्रा शहरातून काढण्यात येणार आहे. यात्रा मुंबई-आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाटा येऊन प्रारंभ होणार असल्याने, ज्या मार्गावरून यात्रा जाणार आहे, त्या मार्गांवर आत्तापासून अनधिकृतरित्या होर्डिंग उभारण्याची स्पर्धाच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये लागलेली दिसून आली आहे. वाहतूक बेटांवरही होर्डिंग्स्‌ उभारण्यात आले असून त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना त्रास होतो आहे. मात्र एरवी तत्पर असलेला महापालिकाचा अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलिसांकडूनही याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा केला जात असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त होते आहे. 

राज्यभर सुरू असलेली भाजपाची महाजनादेश यात्रा नाशिकमध्ये निघणार आहे. या महाजनादेश यात्रेचा समारोप येत्या बुधवारी (ता.18) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये यात्रेचा समारोप होणार आहे. त्यासाठी पाथर्डी फाटा, सिडको, सिटी सेंटर मॉल, संभाजी चौक, मायको सर्कल, त्र्यंबक नाका, पंचवटी असा महाजनादेश यात्रेचा मार्ग आहे. त्यामुळे आत्तापासून भाजपाचे हौसे-नवसे पदाधिकारी- कार्यकर्त्यांकडून यात्रा मार्गावर ठिकठिकाणी अनधिकृतरित्या होर्डिंग्स उभारले जात आहेत. यात, या मार्गांवरील वाहतूक बेटेही सुटलेले नाहीत. 
सिटी सेंटर मॉल, त्रिमूर्ती चौक, संभाजी चौक, मायको सर्कल, तरणतलाव सिग्नल याठिकाणच्या वाहतूक बेटांवरच अनधिकृतरित्या होर्डिंग्स्‌ उभारण्यात आलेले आहेत. काही वाहतूक बेंटांवर अत्यंत धोकादायकरित्या हे होर्डिंग्स लावण्यात आलेले असून, त्यामुळे वाहनचालकांला त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. या होर्डिंग्सच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हौश्‍या-नवश्‍यांकडून प्रचाराचा अन्‌ मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या संभाव्य उमेदवारीचा दावाही "पेश' करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचीही चर्चा आहे. 

सोयीस्कर कानाडोळा 
एरवी, अनधिकृत होर्डिंगबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होते म्हणून तत्पर असलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करीत गुन्हे दाखल केले जातात. तर, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या होर्डिंग्स्‌वर वाहतूक पोलीसांकडूनही कारवाई केली जाते. परंतु सध्या उभारण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग्सकडे महापालिका व पोलिसांकडून सोयीस्कररित्या कानाडोळा केला जात असून, याबाबत सर्वसामान्यांमध्ये उलटसुलट चर्चा आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT