Residential photo
Residential photo 
उत्तर महाराष्ट्र

शिवाजी चुंभळे यांना अवैध मद्यसाठ्याप्रकरणी एक्‍साईजने केली अटक 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना तीन लाख रुपयांच्या लाचप्रकरणी अटक करण्यात आली असता, त्यांच्या निवासस्थानी छाप्यात अवैधरित्या साठा करण्यात आलेला सुमारे पाच लाख रुपयांचा मद्यसाठा सापडला होता. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल करून आज (ता.20) सायंकाळी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून अटक केली. चुंभळे यांच्या निवासस्थानी सापडलेल्या सैन्यदलाच्यासाठीच्या 65 मद्याच्या बाटल्या कशा आल्या, याची उकल चौकशीतून होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, लाचप्रकरणातील तक्रारदाराने पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांकडे, चुंभळे यांच्याकडून जीवाला धोका असल्याने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या शुक्रवारी (ता.16) शिवाजी चुंभळे यांना 3 लाखांची लाच स्वीकारताना अटक केली होती. त्यावेळी त्यांच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात 5 लाख 12 हजार 284 रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल केला होता. या मद्यसाठ्यात 65 बाटल्या या सैन्यदलासाठीच्या असलेल्या होत्या. त्यामुळे सैन्यदलाच्या मद्याच्या बाटल्या इतक्‍या मोठ्याप्रमाणात शिवाजी चुंभळे यांच्यकडे कशा आल्या याबाबतचा प्रश्‍न उभा राहिला आहे. 
तर, लाचप्रकरणी जिल्हा न्यायालयाने गेल्या शनिवारी (ता.17) न्यायालयीन कोठडी सुनावली तर, सोमवारी (ता.19) जामीनही मंजूर केला. मात्र त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यसाठ्याप्रकरणी न्यायालयाकडे शिवाजी चुंभळे यांच्या ताब्याची मागणी केली. त्यास न्यायालयाने मंजुरी दिली. मात्र चुंभळे यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने ते आजपर्यंत (ता.20) जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी दाखल होते. सायंकाळी साडेचार-पाच वाजेच्या सुमारास चुंभळे यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले. त्यामुळे त्यांना पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहात नेले. मात्र त्यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने न्यायालयाच्या आदेशानुसार शिवाजी चुंभळे यांचा ताबा घेत, अटक केली. रात्री उशिरा त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले आहे. सदरची कारवाई जिल्हा अधीक्षक मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व निरीक्षक संतोष चोपडेकर यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक जे.एस.जाखोरे, राजेश धनवटे, मेहरे, पी.एस. पाटील, किरण कदम, मुंढे, परदेशी आदींनी केली. उद्या (ता.21) शिवाजी चुंभळे यांना न्यायालयात हजर करण्यात येऊन कोठडीची मागणी केली जाणार आहे. 
 
तक्रारदाराकडून पोलीस संरक्षणाची मागणी 
लाचप्रकरणी तक्रार दाखल केलेले रवींद्र भोये यांनी पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील व नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. शिवाजी चुंभळे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याने त्यांनी पोलीसांकडे संरक्षणाची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 
 
बॅंकांचे तपशील आज तपासणार 
शिवाजी चुंभळे व त्यांच्या कुंटूबियांच्या बॅंकांच्या तपशिलाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई सुरू केली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंक व भारतीय स्टेट बॅंकेकडून त्यांच्या बॅंक खात्याची माहिती देण्यात आली असून, उर्वरित बॅंकांकडून माहिती मिळणार आहे. त्यासंदर्भातील तपास उद्यापासून सुरू केला जाणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT