ANIS
ANIS 
उत्तर महाराष्ट्र

साकोराच्या चमत्काराचा "अंनिस'ने केला भांडाफोड

सकाळवृत्तसेवा

नाशिक - साकोरा (ता. नांदगाव) येथील एकाने भगवान महावीर स्वप्नात आले आणि त्यांच्या उपदेशानंतरच गावातीलच एका ठिकाणी जमिनीतून त्यांची मूर्ती निघाली. या चमत्काराचा दावा केल्यानंतर त्याची सत्यता पडताळणीसाठी गेलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी त्या व्यक्तीचा गावासमोर भांडाफोड केला आहे. प्रत्यक्षात सदरचा व्यक्ती कर्जबाजारी असून, जैनबांधवांकडून मिळालेल्या देगण्यांसाठी त्याने सदरचे कृत्य केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

साकोरा येथील संदीप कासलीवाल (वय 35) याच्या दाव्यानुसार भगवान महावीर स्वप्नात आले. त्यांच्या सांगण्यानुसार, गावातीलच दिबाबा या ग्रामदैवताच्या चौथऱ्याजवळील जमिनीतून त्यांची मूर्ती सापडली.

सदरची मूर्ती ही इ.स. 1336ची असल्याचा दावा केला होता. त्यामुळे राज्यभरातील जैनबांधव सदरचा चमत्कार व भगवान महावीरांच्या दर्शनासाठी गर्दी करीत होते. तसेच मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी हजारो रुपये देणग्या देत होते. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे एकाने तक्रार केल्याने समितीचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले, जिल्हा प्रधान सचिव उदयकुमार कुऱ्हाडे यांच्यासह "अंनिस'च्या कार्यकर्त्यांनी रविवारी (ता. 15) साकोरे तेथे जाण्यापूर्वी त्यांनी नांदगाव पोलिसात तक्रार करीत संरक्षण घेतले. त्यानंतर प्रत्यक्ष माहिती घेऊन चमत्काराचा भांडाफोड केला.

असा झाला भांडाफोड
गावकऱ्यांच्या मदतीने अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी ओळख लपवून संदीप कासलीवाल याची मुलाखत घेतली. त्यात संशय गेला. जेव्हा अंनिसचे कार्यकर्ते असल्याचे आणि चमत्काराचा दावा करणे गुन्हा असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर कासलीवाल याने आपणास कोणतेही स्वप्न पडले नव्हते. तर आपल्या शेताच्या रस्त्यावर ही मूर्ती सापडल्याची कबुली दिली. तसेच कासलीवाल याच्यावर सुमारे 30 लाख रुपयांचे कर्ज असून देणग्यांमधून सुमारे 15 लाख रुपये जमा झाल्याचेही समोर आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT