Laborers packing pomegranates & Farmers Subhash Bhamre, Rajendra Bhamre, Sahebrao Bhamre inspecting sitafal before packing. esaka
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : साक्रीच्या फळांची आखाती देशांत गोडी अन् डाळिंब, सीताफळ उत्पादक झाले लखपती!

दगाजी देवरे

म्हसदी (जि. धुळे) : राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्रफळ असलेल्या साक्री तालुक्यातील डाळिंब, सीताफळाने आखाती देशांतील बाजारपेठा काबीज केल्या आहेत. बांगलादेश, दुबई, श्रीलंका, रशिया आदी आखाती देशांत या फळांना मागणी असते.

पारंपरिक शेतीला छेद देत आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्वीकारामुळे ‘लखपती’च काय, तर बैलगाडीने प्रवास करणारा बळीराजा वातानुकूल चारचाकी वाहनांचा धनी बनला आहे. फळ शेतीमुळेच तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शासनाने ‘कृषिभूषण’ पुरस्कारानेही गौरविले आहे. (sakri fruits favourites in Gulf countries pomegranate custard apple producers become millionaires Dhule News)

नवनवीन प्रयोगांतून विकासपर्व घडवत कृषी क्षेत्रात अग्रेसर अशी साक्री तालुक्याची नवी ओळख निर्माण होत आहे. गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात सिंचनाची सुविधा बऱ्यापैकी असल्याने पारंपरिक पिकाची जागा फळ, भाजीपाला पिकाने घेतली आहे.

यात डाळिंबासह पेरू, आंबा, टरबूज, पपई, खरबूज, सीताफळ यांसारखी पिके घेतली जात आहेत. तंत्रशुद्ध पद्धतीने शेतीमुळे संबंधित शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे.

पीक पॅटर्न बदलास प्राधान्य

साक्री तालुक्यात काटवन, माळमाथा, पश्चिम आणि दक्षिण पट्टा असे प्रचलित चार भाग पडतात. फळशेतीत काटवन परिसरातील शेतकरी अग्रेसर दिसतात. टरबूज, पपई, शेवग्याच्या शेतीतही प्रावीण्य मिळवीत शेतकरी प्रगत झाला आहे.

काळगाव, ककाणी, दारखेल, जेबापूर, नवडणे, बेहेड, छाईल, दिघावे, उंभरे येथील डाळिंब, सीताफळ, शेवग्याने बाहेरच्या बाजारपेठेत स्थान मिळविले आहे. उत्पादनाचे मार्केटिंग कसे करावे हे शेतकरी समजून घेत आहेत. पीक पॅटर्न बदलण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत.

विक्रीचे नियोजन आत्मसात

अलीकडे ‘पिकवणे सोपे... विकणे अवघड’ अशी अवस्था शेती व्यवसायाची झाल्याची रड असते. त्यावर मात करत शेतकऱ्यांनी कोणत्या वेळेस मागणी असेल अशी वेळ ठरत बागांचे नियोजन केले. तसेच विक्रीचे अचूक नियोजन आत्मसात केले आहे.

तालुक्यातील दर्जेदार फळांनी आखाती देशांतील व्यापाऱ्यांना भुरळ घातली आहे. बांधावर येऊन पॅकिंगमधील फळे व्यापारी खरेदी करत आहेत.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

साक्री ः फळशेतीची स्थिती (आकडेवारी हेक्टर क्षेत्रात)

पेरू.........................४३

लिंबू........................१२

आंबा........................७४

पपई..........................०८

सीताफळ....................३२

द्राक्षे..........................१५

केळी.........................२८

डाळिंब......................२४६

"काळगावसारख्या लहान गावाने शेतीतूनच क्रांती केल्याचे समाधानकारक चित्र आहे. शेती परवडत नाही ही फक्त रडकथा असल्याचे सिद्ध करत जिद्द, मेहनत, नियोजनपूर्वक वेगळी शेती केल्यास यश हमखास आहे." -संजय निंबा भामरे, कृषिभूषण, काळगाव, ता. साक्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

Acute Encephalitis Syndrome: उपराजधानीला मेंदूज्वराचा धोका; शहरात आढळले ८ रुग्ण, मनपाच्या रूग्णालयात उपचाराच्या यंत्रणेचा अभाव

Pune Navratra Mahotsav : ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’मध्ये कला, संस्कृती, गायनाचा संगम; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्‍घाटन

SIP Tips: SIP मध्ये रोज 100 रुपये की महिन्याला 3000 रुपये गुंतवणूक करावी? कुठे होतो जास्त फायदा?

SCROLL FOR NEXT