Dhule News
Dhule News esakal
उत्तर महाराष्ट्र

Water Crisis : साक्रीकरांना उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये; पाणीपुरवठा सभापतींच्या अधिकाऱ्यांना सूचना

सकाळ वृत्तसेवा

साक्री (जि.धुळे) : गेल्या वर्षी उन्हाळ्यात साक्री शहराला टँकरमुक्त केल्यानंतर कुठेही पाणीटंचाई भासू दिली नाही. (Sakrikars should not face shortage of water in summer, water supply chairman's instructions to officials Dhule News)

त्याच धर्तीवर येणाऱ्या उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून नगरपंचायतीच्या यंत्रणेने सावध राहून त्वरित उपाययोजना कराव्यात व नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसू नये यासाठी आतापासूनच तयारी करावी, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती रेखा आबासाहेब सोनवणे यांनी नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत केले.

येणाऱ्या उन्हाळ्यात अर्थात मार्च, एप्रिल व मे महिन्यात साक्री शहराला पाण्याची टंचाई भासू नये म्हणून उपाययोजना करण्यासाठी बैठक झाली. बैठकीला नगराध्यक्षा जयश्री पवार, बांधकाम सभापती ॲड. गजेंद्र भोसले,नगरसेवक दीपक वाघ, प्रवीण निकुंभ, उषा पवार, पाणीपुरवठा अभियंता श्रीकांत फागणेकर, कार्यालय अधीक्षक चौधरी, कर्मचारी अमोल पाठक आदी उपस्थित होते.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात आहे त्या पाणीपुरवठा योजनेमधूनच संपूर्ण शहराला नियोजनबद्ध पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे शहर टँकरमुक्त झाले होते. त्याच धर्तीवर येणाऱ्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये म्हणून आतापासूनच तयारी करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळेस शहरातील तसेच कॉलनी परिसरात ज्या ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो त्या ठिकाणी नवीन वितरण वाहिन्या टाकण्याचे सुचविण्यात आले तसेच जिल्हा नेते अमरिशभाई पटेल यांच्या आमदार निधीमधून शहरात तसेच कॉलनी परिसरामध्ये सहा ठिकाणी बोअरवेल घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

दातर्तीहून होणारी पाणीपुरवठा योजना तसेच कवठे येथील पाणीपुरवठा योजना या संदर्भातही चर्चा करण्यात आली. पाणीपुरवठा करणारे कर्मचारी व वॉलमन यांनी शहरात तांत्रिक पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी दक्ष राहावे व नागरिकांशी सौजन्याने वागावे, अशा सूचना पाणीपुरवठा सभापतींनी दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT