Sale of biodiesel like fuel in Khapar area nandurbar news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : बायोडिझेलसदृश इंधनाची खापर परिसरात विक्री; डिझेलपेक्षा 20 ते 25 रुपयांनी स्वस्त

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : महाराष्ट्र आणि गुजरातची सीमा असलेल्या अक्कलकुवा तालुक्यात डिझेलची तस्करी होत असून, बायोडिझेलसदृश इंधनाची ६५ रुपये प्रतिलिटर प्रमाणे सर्रासपणे विक्री होत आहे.

त्यामुळे लगतच्या पंपावरील विक्रीवर त्याचा परिणाम झाल्याने चालकांनी प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे अवैध मद्याचीही खुलेआम विक्री होत आहे. (Sale of biodiesel like fuel in Khapar area nandurbar news)

मात्र या साऱ्यांकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक नावालाच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती एका वर्षाहून अधिक काळ स्थिर आहेत.

मात्र राज्यस्तरीय करांमुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत काही किरकोळ बदल पाहायला मिळतात. आजमितीस सर्वांत स्वस्त डिझेल अक्कलकुवा तालुक्यात मिळत आहे. इतरत्र डिझेलचे दर ९० ते ९४ रुपये आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र बायोडिझेलसदृश इंधनाची येथे ६५ रुपयांप्रमाणे विक्री होत आहे. तालुक्यातून जाणाऱ्या नेत्रांग-शेवाळी महामार्गावरील काही ढाब्यांवर हे इंधन सहज मिळते. मोलगी, अक्कलकुवा, खापर या शहरांमध्ये मद्याचीही तस्करी होत आहे. यासंदर्भात आमदार आमश्या पाडवी यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला आहे.

गुजरातमध्ये मद्यविक्रीला बंदी असल्याने मध्य प्रदेश-हरियानातील मद्य अक्कलकुवा तालुक्यातून तस्करी होते. नवापाडा (ता. अक्कलकुवा) येथे काही दिवासांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. त्यात दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Racism in Australia : भारतीयांना मारुन टाका अन् त्यांच्या बायका गुलामगिरीसाठी विका... ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

Hingoli: हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; नांदेड ते पूर्णा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन

...अन् अचानक सेटवर आले रोहित शेट्टी! 'Governor' च्या शूटिंग दरम्यान चिन्मय मांडलेकरसोबत घडला रंजक प्रसंग

SCROLL FOR NEXT